नागपूर :- प्राचीन बस्तरच्या दंतेवाडा या नगरीत माय दंतेश्वरी चे सुप्रसिद्ध मंदिर आहे. आदिम हलबा या आदिवासींची कुलदैवत बिलाई माता होती, कालांतराने हलबा या आदिवासींची कुलदैवत व आराध्य दैवत म्हणून माय दंतेश्वरी झाली. माय दंतेश्वरी समोर आदिम हलबा बांधव दसराच्या दरम्यान दसरा उत्सव साजरा करतात. आदिम हलबा आदिवासींनी प्राचीन काळापासून बिलाई माता किंवा माय दंतेश्वरी समोर नरबळी देण्याची आदिवासी प्रथा बंद होऊन पशु बळीवर आली. आदिम हलबा हि जमात बस्तरवरून विदर्भात येऊन बसल्याने माय दंतेश्वरीचे विदर्भात माता माय म्हणून पूजा करतात. हलबा आदिवासींत माय दंतेश्वरी वर अतूट श्रद्धा आहे. प्राचीन काळापासून विदर्भात आदिम हलबा,हलबी आदिवासी आल्याने नागपूरातील गोळीबार चौकाजवळ माय दंतेश्वरी ची स्थापना करून नवरात्र दरम्यान ॲड.नंदा पराते ह्याच्या मार्गदर्शनात १० दिवस दसरा उत्सव करण्यात येत आहे. यावेळी दररोज माय दंतेश्वरी ची पूजा व महाआरती करण्यात आली.
आदिम नेत्या ॲड. नंदा पराते यांच्या आयोजनात माय दंतेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाकडून दसरा उत्सवात लहान मुला-मुलीचे खेळ, रांगोळी , चित्रकला स्पर्धा ,जागरण,आनंद मेळावा,कन्या भोजन, महाप्रसाद वितरण, अष्टमी पुजन, रास गरबा इत्यादी कार्यक्रम उत्साहात पार पडले. या दरम्यान आदिवासी पध्दतीने महापूजाचा कार्यक्रम संपन्न होतो. गोळीबार चौकातील या उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमाने हजारो हलबा बांधव माय दंतेश्वरी ची पूजा करतात.
या उत्सवादरम्यान माय दंतेश्वरी ची महाआरती काँग्रेसचे जेष्ठ नेते दिपक काटोल, उमेश डांगे, प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते ,शहर काँग्रेस उपाध्यक्ष कृष्णा गोटेफोडे,,पिंटू बागडी ,माजी नगरसेवक राजू तंबूतवाले,मंडळ अध्यक्ष अतुल सदावर्ती,चंद्रशेखर बावणे,अशोक निखाडे, आकाश बावणे, नितेश धार्मिक,शकुंतला वठ्ठीघरे , शुभम सदावर्ती, अनिता हेडाऊ, मंजू पराते,गिता बावणे,गिता हेडाऊ, मंदा शेंडे सह मान्यवर यांनी केली. .
आदिम नेत्या ॲड. नंदा पराते यांच्या मार्गदर्शनात दसरा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी चंद्रशेखर बावने,अतुल सदावर्ती, मंजूषा पराते,अनिता हेडाऊ, धनंजय सदावर्ते,मंदा शेंडे, माया धार्मिक, शकुंतला वठ्ठीघरे यांना अथक परिश्रम घेतले.