*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
नागपूर :- एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या सुरेखा राउत आपली पर्स मेट्रो प्रवासादरम्यान विसरल्या होत्या. क्रेडीट कार्ड आणि इतर अस्तु आपल्याला परत मिळतील का ही चिंता त्यांना सतावित होती. पण मेट्रो अधिकाऱ्यांनी पर्स जैसे थे स्थिती परत केल्यावर त्यांनी मोठा दिलासा मिळाला.
शाळकरी विद्यार्थी अभिजित महाजनचे पाकीट मेट्रो गाडीत राहिले होते. पाकिटात असलेले मेट्रो प्रवासाचे पैसे आणि वडिलांनी दिलेला पॉकेट मनी कायमचे गमावल्याचे अभिजित ला वाटले होते. पण संपूर्ण वस्तूंसह पाकीट परत मिळाल्याने त्याचा चेहऱ्यावर हसू फुलले.
अभिजित महाजन आणि सुरेखा राउत या दोन व्यक्तींचा हा अनुभव असला तरीही प्रत्यक्षात मात्र नागपूर मेट्रोने प्रवासादरम्यान विविध वस्तू विसरलेल्या तब्बल ४५० प्रवाश्यांचे साहित्य परत करीत त्यांना आनंदित केले आहे. आपली मौल्यवान वस्तू आपल्याला कधीच परत मिळणार नाही या दुखःत असलेल्या प्रवाश्यांकरता अनपेक्षितपणे हरवलेली वस्तू परत मिळणे मोठा दिलासा होता.
मेट्रो प्रवासादरम्यान असे अनेक प्रसंग घडत असतात अनेक नागरिक त्यांच्या सोबतचे सामान विसरतात किंवा ते नकळत हरविल्या जाते ज्यामध्ये लॅपटॉप, बॅग, पॉकेट, घड्याळ, मोबाईल ई. वस्तूंचा समावेश असतो. अश्या वेळी हे प्रवासी मेट्रो स्टेशनवरील कर्मचारी आणी अधिकार्यांना त्या संबंधी माहिती देतात. वस्तू परत मिळाल्यावर प्रवासी मेट्रो कर्मचार्यांना आणि अधिकाऱ्यांना भरभरून आशीर्वाद देतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.
महा मेट्रो कर्मचारी या प्रकारच्या घटने करिता नेहमी सतर्क असून हरविलेले सामान संबंधित व्यक्तीकडे सुरक्षितरित्या परत केल्या जाते ज्याकारता महा मेट्रोच्या `सापडलेले आणि हरवलेली वस्तू सेल’ तयार केला आहे. या माध्यमाने अश्या सर्व वस्तूंची नोंद घेतल्या जाते, त्या वस्तूचा शोध घेतला जातो आणी टी वस्तू मिळाली तर संबंधित व्यक्तीला परत केली जाते.
महा मेट्रो नागपूर या करता नेहमीच कटिबद्ध असली तरीही प्रवाश्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घेण्याची विनंती सर्व मेट्रो प्रवाश्याना करते आहे. परत सार्वजनिक वाहतुकीत नागरिकांच्या पसंतीस उतरलेली वाहतूक सेवा म्हणजे नागपूर मेट्रो रेल सेवा. मेट्रो हे वाहतुकीचे सर्वोत्तम, सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर आणि सुरक्षित साधन आहे. नोकरीपेशा लोकांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मेट्रो अत्यंत उपयुक्त ठरत असून स्टेशन परिसरातील सेवामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा देखील होत आहे.