नागपूर :- हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगष्ट “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या औचित्याने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त म.न.पा. तर्फे दि. 29 ऑगष्ट 2024 रोजी नवी शुक्रवारी शाळा, गाडीखाना मैदान येथे म.न.पा. शाळेतील विद्यार्थ्यांकरीता विविध खेळ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. विवेक अवसरे, प्राचार्य, तिरपुडे शारिरीक शिक्षण महाविद्यालय यांचे हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेला म.न.पा. क्रीडा अधिकारी, डॉ. पियुष आंबुलकर, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, उपशिक्षण अधिकारी दिघोरे, क्रीडा निरीक्षक उज्वला चरडे, क्रीडा विभागाचे जितेन्द्र गायकवाड, क्रीडा विभागाचे कर्मचारी व म.न.पा. शिक्षक गण स्पर्धेत उपस्थित होते. या स्पर्धेला म.न.पा. शालेय 600 हून अधिक खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या विविध खेळ स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, रस्साखेच, लंगडी, 100 मी. रनिंग, थाळीफेक, गोळाफेक, बास्केटबॉल या खेळांचा समावेश होता. या स्पर्धा संपन्न झालेल्या असुन खालील शाळांची प्राविण्य प्राप्त केलेले आहे. प्राविण्य प्राप्त शाळेतील खेळाडूंना विविध प्रकारे वस्तु स्वरुपात पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.