नागपूर :- बेलतरोडी पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे हद्दीत, हॉटेल श्रध्दा एन, ओयो, नरेन्द्र नगर, रूम नं. २०४, मध्ये रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी १) सुरज रमेश गुंफावार वय २७ वर्ष रा. सोळंकीवाडी, सक्करदरा, नागपूर २) कु. हर्षा सुभाष भगत वय २७ वर्ष रा. गल्ली नं. २, विश्कर्मा नगर, अजनी, नागपूर यांची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यांचे ताब्यातुन ७ प्रेम एम.डी. पावडर, तसेच दोन मोबाईल फोन, रोख ३,२००/- रू. असा मुद्देमाल मिळुन आला. आरोपोंचे ताब्यातुन सपुर्ण मुद्देमाल व बुलेट वाहन असा एकुण ३,४०,७००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपींचे कृत्य है कलम ८(क), २२(क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट, नुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे वेबेलतरोडी येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त (परि. क. ४), विनायक कोते, सहा. पोलीस आयुक्त (अजनी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, वपोनि, मुकुंद कवाडे व त्यांचे सहकारी यांनी केली.