नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क्र. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे पारडी हद्दीत, भंडारा रोड, आर्या शोरूम जवळ, पारडी नाका येथे सापळा रचुन एक निळया रंगाची टाटा झेस्ट कंपनीची कार थांबवुन चालक व सोबत असलेला यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी आपले नाव १) मोहसीन शाह यासीन शाह वय ३४ वर्ग रा. वार्ड नं. ५, खान कॉलोनी, छिंदवाडा, मध्य प्रदेश २) ऋषी चैनसुख राठोड वय २८ वर्ष रा. वार्ड नं. ५. जुनारपूर, छिंदवाडा, मध्य प्रदेश असे सांगीतले, त्यांची व वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यांचे ताब्यातुन ५४ प्रेम २५ मिली ग्रॅम एम.डी. पावडर तसेच एक देशी बनावटीची रिवॉल्वर लाकडी मुठ असलेली, एक जिवंत कारतुस व दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल मिळुन आला. आरोपींचे ताब्यातुन सपुर्ण मुद्देमाल व वाहन असा एकुण १०१८.५००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे कृत्य हे कलम ८ (अ), २२(ब) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट, सहकलम ३/२५ भा.ह. का, सहकलम १३५ म.पो.का नुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे पारडी येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पारडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, /राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि, कमलाकर गड्डीमे व त्यांच पथकाने केली.