नागपूर :- गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार है पोलीस ठाणे राणाप्रतापनगर हहीत, पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मोखारे कॉलेज रोड, अशोक ठाकरे यांचे घरा समोर, सार्वजनिक रोडवर एक संशयीत ईसम वय अंदाजे २५ ते ३० वर्ष वयाचा हा संशयीतरित्या फिरतांना दिसुन आल्याने, त्यास स्टॉफचे मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव नझीम वेग अहफाज बेग मिर्झा वय २८ वर्ग, रा. मोमीनाबाद कॉलोनी, मंगलमुर्ती ले-आउट, पांढरकवडा, जि. यवतमाळ असे सांगीतले. त्याची अंगड़ाडती घेतली असता त्याच्या जिन्स पॅन्टचे खिश्यात प्लास्टीच्या प्रेसलॉक पन्नीमध्ये १२ ग्रॅम एम. डी. पावडर किंमती १,२०,०००/-रु. ची मिळून आली. आरोपीचे ताब्यातुन एम.डी. पावडर, एक मोबाईल फोन असा एकुण १,३०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे हे कृत्य कलम ८ (क), २२(ब) २९ एन.डी.पी. एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे राणाप्रतापनगर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई कामी राणाप्रतापनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि, रविन्द्र नाईकवाड, सपोनि, मनोज घुरडे, पोहवा. पवन गजभिये, विजय यादव, पवन गजभिये, विवेक अडाऊ, मपोहवा, अनुप यादव, नापोअं, अरविंद गेडेकर, पोअं, रोहीत काळे, सहदेव चिखले व राजु पाटील यांनी केली.