– दीक्षाभूमी ते लेह लद्दाख असणार धम्म पदयात्रा
– 15 जुलैला लेह लद्दाख येथे होणार समारोप
– आज १०० श्रामणेरांना दिली धम्मदीक्षा
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देश पुढे देवून थायलंड येथील मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथी व त्यांच्या इतर १० भंतेंच्या प्रमुख उपस्थित पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांना अभिवादन करून दीक्षाभूमी ते लेह लद्दाखपर्यंतच्या धम्म पदयात्रेला प्रारंभ झाला. दीक्षाभूमीवरून निघून हि धम्मपदयात्रा कन्हानलगतच्या सिहोरा येथे जाणार असून तेथे श्रामणेरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याप्रसंगी गगन मलिक फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गगन मलिक, थायलंडचे भंते कंतराथाना, भंते रुपेश, भंते प्राखंती बरोम, भंते थीयाछयो, भंते प्रार्थनासून, चीतिको भिकू, प्रहरा महाछाटवना, अनुसूचित जाती राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, राजेश लाडे, पी. एस. खोब्रागडे, ममता गेडाम, गगन मलिक फाउंडेशनचे राष्ट्रीय समन्वयक नितीन गजभिये आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी उरुवेला कॉलोनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १०० लोकांना थायलंड पद्धतीने श्रामणेर दीक्षा देण्यात आली. थायलंड येथील मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथी यांनी सर्वांना श्रामणेर दीक्षा, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा दिल्या. यावेळी बोलताना भन्ते पहरा थेपारीयातीसुथी म्हणाले, जगात फार अशांतता आहे, आपापसातील वैर वाढले आहे, द्वेष, मत्सर वाढला आहे. जातीयवाद वाढला आहे. यातून मुक्ती जर हवी असेल तर बुद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल. तथागत भगवान बुद्ध भारतात जन्माला आले मात्र त्यांचा धम्म विदेशातच मोठा प्रमाणात भरभराटीस आला. भारतात बुद्ध-धम्म आणि तथागतांचे धम्मचक्र कुठेच दिसत नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांचा समता, बंधुता आणि शांतीचा संदेश जगभर पोहोचावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने हि धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले.
गगन मलिक फाऊंडेशन आणि आश्रय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र दीक्षाभूमी ते लेह लद्दाखपर्यंत धम्म पदयात्रा दीक्षाभूमी येथून आज सुरुवात झाली. 6 ते 8 मे असे दोन दिवस सिहोरा कन्हान येथे श्रामनेर प्रशिक्षण झाल्यानंतर जवळपास 100 श्रमनेरांना राजगीर येथे नेण्यात येईल. तेथून वेणुवन आणि वेणुवंन ते बुद्धगया, बुद्धगया ते धर्मशाला आणि धर्मशाला येथून धम्म पदयात्रेला सुरुवात होईल. या धम्म पदयात्रेत भारतातील 100 तर थायलंडचे 100 भंते सहभागी होतील. ही धम्म पदयात्रा 15 जुलै रोजी लेह लद्दाख येथे पोहोचेल व तेथे समारोप होईल.
कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी गगन मलिक फाउंडेशनचे विशाल कांबळे, विकास तायडे, प्रकाश कुंभे, स्मिता वाकोडे, गुणवंत सोनटक्के, वर्षा मेश्राम, रवी सवाईथुल, रोशन महाजन, कुणाल मेश्राम यांच्यासह गगन मलिक फाउंडेशनचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.