7 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

गडचिरोली :- सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, शासन परिपत्रकामधील सुचनानुसार लोकशाही दिन दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी (सोमवार) दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात येत आहे.

सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Nagpur Division Achieves Significant Growth in Catering Earnings and Strengthens Food Safety Measures

Wed Apr 2 , 2025
Nagpur :- The Nagpur Division of Central Railway has achieved remarkable growth in catering earnings for the financial year, surpassing set targets and implementing robust monitoring measures to enhance passenger services. *Key Highlights:* *Record Earnings in March 2025:* The division recorded earnings of Rs. 57.25 lakh, reflecting a 59% increase compared to March 2024. *Cumulative Financial Year Earnings:* The total […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!