लोकसभा निवडणूक 2024 टप्पा 3 : नऊ वाजेपर्यंत १०.५७ टक्के मतदान, महाराष्ट्रात मतदानाचं प्रमाण सर्वात कमी

देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. आज (मंगळवार, ७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे अवध्या देशाचे लक्ष लागलं आहे. यात बारामती, कोल्हापूर, सांगलीसह इतर काही मतदारसंघांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नारायण राणेंचा विनायक राऊतांना टोला; म्हणाले, “मला पेपर सोपा वाटतो, जे अभ्यास करत नसतात त्यांना…”

Tue May 7 , 2024
रत्नागिरी :- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. आज सकाळी सात वाजताच मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाकडे देशवाशियांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुचीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. नारायण राणे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधकांना खोचक टोला लगावला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com