अमरदिप बडगे, प्रतिनिधी
नराधम बलात्काऱ्याना भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी
आरोपींना त्वरीत अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा
गोंदिया :- जिल्ह्यातील 35 वर्षीय महिलेवर गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह येथे झाला असून त्या घटनेचे पडसाद हळूहळू उमटायला लागले आहेत, यात गोंदिया लोधी समाज पीड़ित कुटुंबियांच्या पाठीशी उभा झाला असून नराधम बलात्कारी नराधमांना त्वरीत अटक करून भरचौकात फाशी देण्याची मागणी केली.
तर आरोपींना लवकरात लवकर अटक केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा लोधी समाजबांधवानी दिला, दूसरी कड़े आपल्या पीड़ित बहिनीच्या चिंताजनक प्रकृतिने भाऊ चिंतेत असून पीडितेला आरोग्य सेवा योग्य मिळण्याची मागणी केली आहे. दरम्यान आरोपीच्या अटकेबाबत होत प्रशासनाकडून होत दिरंगाई बाबत संताप ही व्यक्त केला आहे.