लाईनमन हा वीज वितरण यंत्रणेचा कणा – सुहास रंगारी

नागपूर :- लाईनमन हा वीज वितरण यंत्रणेचा कणा आहेत, तो कणा ताठ राहण्यासाठी व्यवस्थापन सदैव त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिली. महावितरनच्या कॉग्रेसनगर विभागाच्या वतीने शंकरनगर येथील इंडीयन वॉटर वर्क्स असोसिएशन सभागृहात आयोजित लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते.

महावितरण आहे म्हणुन आपण सर्व आहोत, एक कुटुंब म्हणुन आहोत, महावितरन टिकले तर आपण सर्व टिकू, त्यामुळे महावितरणला टिकविणे आपले आद्य कर्तव्य असल्याची जाणिव आपल्या सर्वांना असायला हवी असे सांगतांना प्रादेशिक संचालक पुढे म्हणाले की, गणवेश आपली ओळख आहे, गणवेश असला की कुणाचीही तुम्हाला थांबविण्याची हिंमत होणार नाही, कोविद काळात सुरळित वीज पुरवठ्यामुळे जनता आपल्या घरात राहू शकल्याने अनेकांचे प्राण वाचले, यासाठी वीज कर्मचा-यांना कोरोना योद्धा म्हणुन ओळख मिळाली नसल्याची खंत देखील सुहास रंगारी यांनी यावेळि व्यक्त केली. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे आणि महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी आपल्या भाषणातून ऊन-वारा-फाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र काम कत्रणा-या जनमित्रांचा महावितरणला अभिमान आहे, 2013 पासून महावितरणच्या कर्मचारी भरतीत महिलांसाठी 33 टक्के जागा राखिव केल्याने आज मोठ्या संख्येने महिला कर्मचारी देखील जनमित्र म्हणुन कार्यरत आहेत, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे काम कुठेही कमी पडलेले नाही. काम करतांना अनेक प्रश्न उद्भवतात मात्र, त्यांचे समाधान देखील आपणच शोधाले की कामाची गती वाढते.

या कार्यक्रमाला नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कॉग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ग़्होके, कार्यकारी अभियंता (प्रशासन ) प्रतिक्षा शंभरकर, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अनुजा पात्रीकर यांचेसह विभागातील सर्व अभियंते, कर्मचारी व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना महामारी आणि कामावर असतांना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचा-यांना आदरांजली अर्पण करण्यात आली, सोबतच उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचा-यांना विद्युत सुरक्षेची सामुहीक शपथ देण्यात आली

महावितरणच्या विविध कार्यालयात लाईनमन दिवस उत्साहात साजरा

लाईनमन दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत गांधीबाग नंदनवन, वर्धमान नगर, गांधीबाग, उमरेड, कुही, रामटेक, सुभेदार, मानेवाडा, सिव्हील लाईन्स, काटोल, बुटीबोरी, खॉग्रेसनगर, खापरखेडा, पारशिवनी, वर्धा, मौदा यासह इतरही कार्यालयात विद्युत सुरक्षा कार्यशाळा, रॅली, विविध स्पर्धा आदीचे आयोजन करून जनमित्रांचा गौरव करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mon Mar 4 , 2024
– वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व  शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण वाशिम :- शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!