‘लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम – कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी

– मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन

मुंबई :- मुलुंड (आय.टी.आय.) येथे सुरू झालेला लाइटहाऊस प्रकल्प दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. कोणत्याही पदवीबरोबरच जागतिक बाजारपेठेत आवश्यक कौशल्य विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हा फाऊंडेशन कोर्स आधुनिक काळातील कौशल्य विकासासाठी महत्वाची भूमिका बजावेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी सांगितले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग (SEEID), व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड येथे मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन आयुक्त चौधरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाचे संचालक योगेश पाटील, लाइटहाऊस कम्युनिटीजचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन, इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेडचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी पी. डी. मुंद्रा, लाइटहाऊस कम्युनिटीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर उपस्थित होते.

आयुक्त चौधरी म्हणाल्या, युवक आणि युवतीना स्पोकन इंग्लिश आणि डिजिटल साक्षरता अशा प्रकारचे प्रशिक्षण लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही २१ व्या शतकातील आवश्यक आणि गरजेची कौशल्ये आहेत. केवळ रोजगार देण्याऐवजी हा कार्यक्रम तरुणांना नोकरीत राहण्यास आणि करिअर घडविण्यास सक्षम करतो.

दळवी म्हणाले, गेल्या वर्षी लाइटहाऊस प्रकल्प सुरू करण्याबाबत सामंजस्य करार झाला आणि आज या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली. आय. टी. आय.मध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित जीवनात लागणारी कौशल्य विकसित होतील.

डॉ. नटराजन म्हणाले की, लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून २०३० पर्यंत दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखों युवक-युवतींचे जीवन बदलण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल.

मुंद्रा म्हणाले की, “लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनने देशात विविध उपक्रम राबवले आहेत. मुंबईत या उपक्रमाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.

शेफाली शिरसेकर आणि वैभव कोल्हे यांनी प्रस्ताविक केले. लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुलेकर यांनी आभार मानले.

लाइटहाउसच्या माध्यमातून रोजगार क्षमता वाढेल

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड येथे हा प्रकल्प सुरु झाला आहे. लाइटहाऊस प्रकल्प आय.टी.आय, मुलुंड येथे ३००० चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात आलेला आहे. यामध्ये विविध वर्ग खोल्या तयार करण्यात केल्या आहेत. यामध्ये, खजाना, कट्टा, टेक- हब आणि क्लासरूम असून या प्रकल्पामार्फत युवकांना विविध कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास विकासावर भर देण्यात येतो. मुलुंड लाइटहाऊसमध्ये कमी उत्पन्न समुदायातील १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक आणि युवतींना माहिती, करिअर समुपदेशन, व्यावसायिक कौशल्ये देण्यात येत असून, नोकरी मिळवण्यासाठी आणि नंतरचेही सहकार्य करण्यात येत आहे. याद्वारे त्यांना उपजीविका करता येईल. व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमांची रचना करताना उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा समावेश केला जाईल. ज्यामुळे तरुणांची रोजगारक्षमता वाढेल. लाइटहाऊस कार्यक्रम हा भारतामध्ये ४ राज्यांमध्ये आणि १० शहरांमध्ये सुरू आहे. लाइटहाउस प्रकल्प हा सार्वजनिक खासगी भागिदारी (PPP) द्वारे चालवले जातात. ज्यामध्ये सरकारी संस्था, कॉर्पोरेट्स, सामाजिक संस्था आणि नागरिक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदलासाठी काम करतात.

लाइटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन बद्दल

लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन हे संपूर्ण भारतातील एक दशलक्ष वंचित तरुणांसाठी जीवन-कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता यांच्या संधी निर्माण करून एक सक्षम समाज निर्मिती करण्याच्या मोहिमेवर आहे. ही संस्था 2015 पासून एका वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक-खासगी भागिदारीतून मोठ्या प्रमाणावर परिवर्तनासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत 1.5 लाखांहून अधिक नागरिकांना याचा लाभ झाला आहे आणि 2030 पर्यंत 10 लाखाचा आकडा गाठण्याचे ध्येय ठेवले आहे.

इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेड

इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेड ही एक बीएसई आणि एनएसई यादीत असलेले, मुंबईस्थित भारतीय आयटी सल्लागार आणि आउटसोर्सिंग बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तीन स्थानिक सुट्टया जाहिर 

Tue Jan 9 , 2024
नागपूर :- संपूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त विजलक्ष्मी बिदरी यांनी स्थानिक सुट्टया जाहिर केल्या आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टयांमध्ये मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी तान्हा पोळा, बुधवार दिनांक 11 सप्टेंबर महालक्ष्मी पूजन (ज्येष्ठगौरी पूजन ) सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024- धम्मचक्र प्रवर्तन दिन या तीन सुट्टयांचा समावेश आहे. हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com