झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक…

हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, याविषयावर सरकारला विचारले प्रश्न…

मुंबई  :- झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा पंधरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार निदर्शने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CAMIT Felicitates DyCM for Presenting a Exemplary State Budget

Tue Mar 21 , 2023
Nagpur :- Dr. Dipen Agrawal President of Chamber of Associations of Maharashtra Industry & Trade (CAMIT) on behalf of Trade and Industry of state welcomed and Felicitated the DyCM and Finance Minister Devendra Fadanvis with shwal and flower bouquet and congratulated him for presenting an exemplary State Budget for the year 2023-24. Agrawal said, it is not just any budget […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!