सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करा – जिल्हाधिकारी

नागपूर : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.

ध्वजदिन निधी 2022 संकलनासाठी राज्य शासनाने नागपूर जिल्ह्यास 1 कोटी 91 लाख 98 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. या राष्ट्रीय कार्यास जिल्ह्यातील सर्व विभाग, शासकीय तथा निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, उद्योजक, सहकारी संस्था, बँका, शाळा, व्यापारी वर्गांनी जास्तीत जास्त निधी देत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संकलित झालेला निधी बँक, धनाकर्ष, धनादेश, रोख स्वरूपात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर यांच्या नावाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्रमांक १,तिसरा माळा, सिव्हिल लाईन्स, येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार 30 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन

Wed Jan 11 , 2023
नागपूर : जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून कुष्ठरोगाविषयी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन समन्वय समितीची सभा संपन्न झाली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com