काटोल :- पोस्टे काटोल येथील स्टाफ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय काटोल विभाग येथील स्टाफ यांनी पो.स्टे. काटोल हद्दीत मौजा खानगाव डोंगरगाव पारधी वेडा येथे अवैधरित्या गावठी पद्धतीने भट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे एकुण ०९ इसमावर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु गाळणारी एकुण ०७ महिला आरोपौ व ०२ पुरूष आरापोंवर कारवाई करून मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातून १) इमची पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे ४५०० लिटर मोहाफुल रसायण सडवा किंमती ९०,०००/- ३) काळया रंगाव्या रबरी ट्युबमध्ये अंदाजे ५० लिटर प्रमाणे एकुण १६०० लिटर हातभट्टी मोहाफुलाची गावठी दारू किंमत ८०,०००/- रु ४) प्लास्टीक इम, जलाउ लाकडे दारू गाळण्याचे साहित्य किंमत ११,२००/- रु असा एकुण १,८१,२००/- रू चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. एकुण ०९ आरोपींविरुद्ध पो.स्टे काटोल येथे कलम ६५ (एफ), (सी), (ई) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोहार, मा अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल बापु रोहम यांचे मार्गदर्शनात पोस्टे काटोल येथील ठाणेदार निशांत मेश्राम, सपोनि शितल खोब्रागडे, सफौ वनराज भुक्ते, पोना विकास वाईलकर, पौना संतोष राठोड, पोना रंजित रोकडे, प्रविण पवार, पोशि सचिन डायलकर, रमेश काकड, पोशि बबन बन्सुले तसेच पोस्टे काटोल नरखेड जलालखेडा कोंढाळी येथील स्टाफ यांनी पार पाडली