पोस्टे नरखेड हद्दीत अवैधरित्या मोहफुल गावठी दारू काढणाऱ्या इसमांवर कायदेशिर कार्यवाही

नरखेड :- पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. १४/०२/२०२४ रोजी देवळी नरखेड, मौजा नरखेड टाउन, पिठोरी नरखेड येथे मोहाफूल गावठी दारू गाळणाऱ्या इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण ०३ आरोपी हे मोहफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून मोहाफुल दारूने एकूण ४९ लिटर मोहाफुल गावठी दारू प्रति लिटर ५०/- रू प्रमाणे एकूण २४५०/- चा मुद्देमाल मिळून आल्याने नष्ट करण्यात आला. आरोपी नामे- शालीकराम श्रीराम चकपाणी, वय ४२ वर्ष, रा. देवळी ता. नरखेड २) विजय सुरेश अरखेल, वय ४० वर्ष, रा. वार्ड क्र. १२ नरखेड ३) निलेश भाउराव उईके, वय ३० वर्ष, रा. पिठोरी ता. नरखेड यांचे विरुद्ध पो.स्टे नरखेड येथे कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे नरखेड ठाणेदार सपोनि कृष्णा तिवारी, पोहवा गजानन तितरे, पोशि जालिंदर राठोड, सफौ सनेश्वर, पोशि दिनेश हिवसे, दिनेश कुमेरीया, पोहवा भुजंग बन्सोड, अक्षय ठाकरे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Survey report on examining backwardness of Maratha community submitted to Chief Minister

Fri Feb 16 , 2024
– Appreciation for completing survey in record time working day and night – Maratha community will be given reservation within the legal framework without disturbing quota of othe communities : Chief Minister Eknath Shinde   Mumbai :- Chairman of the State Backward Class Commission retired Justice Sunil Shukre today submitted the statewide survey report on examining backwardness of the Maratha community […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!