कुही :-पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. २१/११/२०२३ रोजी वडद पारधी बेडा येथे मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण ०१ महिला व ०३ पुरूष आरोपी नामे १) रविन्द्र मोरेश्वर पवार वय ३४ वर्ष, २) रूशी यजु माळी वय ३२ वर्ष ३) जितेश रसवंत पवार वय ३२ वर्ष हे मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळून आले. आरोपींचे ताब्यातून एकुण मोहाफूल रसायण सडवा ६१०० लीटर सड़वा रसायन २०/-रू लीटर प्रमाणे १२२०००/- रू चा माल तसेच लहान मोठे ड्रम व इतर साहित्य किंमती ४६०००/रू व ३५ नग देशी दारू भरलेल्या शीषा प्रत्येकी १८० एम एल च्या प्रति निप ७०/- रू प्रमाणे २४५०/रू एकूण किंमती १७०४५०/ मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. ०१ महिला व ०३ पुरूष आरोपी विरुद्ध पो.स्टे कुही येथे कलम ६५ (ई), (फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधीश्चक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर अणेदार पोस्टे कुही, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, संजय बान्ते, अरविंद भगत, रोशन काळे, राजु रेवतकर, प्रमोद वानखेडे, नितेश पोशि, निलेश इंगुलकर, मपोशि वनिता शेन्डे, कविता बचले, पो.स्टे. कुही पोलीस स्टॉफ सफौ संजय कुलकर्णी, पोहवा चांगदेव कुथे, पोशि दुर्गश डहाके, मपोशि दुर्गा शंभरकर, दिक्षा गोंडाणे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.