गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील ली वाघिणीची प्रसूती

नागपूर:-आज दिनांक २४/१२/२०२२ रोजी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहाळयातील ’ली’ वाघिणीला सकाळी ८.०० वा. सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्या. यापुर्वी ’ली’ वाघिणीचा प्रसवानंतर लगेच शावकांना तोंडात दाबून मारण्याचा इतिहास लक्षात घेता पिल्लांना तातडीने वेगळे करुन पिल्लांच्या कृत्रिम संगोपनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळी ८.२५ मि. सुमारास वाघिणीने पहिल्या पिलाला जन्म देण्य़ास सुरवात केली. सदर पिल्लू अर्धे बाहेर आले असताना वाघिणीने या पिल्लाला तोंडाने बाहेर ओढून काढले. यावेळी पिल्लाच्या मानेजवळ जखम झाल्याने या पिल्लाचा त्यातच दुर्देवी मृत्यू झाला. यानंतर अनेक तास वाघिणीच्या प्रसव वेदना थांबल्या होत्या.

दुपारी २.३० मि. सुमारास वाघिणीला पुन्हा प्रसव वेदना सुरू झाल्या. यावेळी वाघिणीने दुसऱ्या पिल्लाला जन्म दिला. यावेळी ली’ला तातडीने पिलापासून वेगळे करुन पिलाला पशुवैद्यकिय पथकाने ताब्यात घेतले असता सदर पिल्लू मृत जन्माला आले असल्याचे लक्षात आले. यावेळी प्राणिसंग्रहालयाचे संचालक शतानिक भागवत, पशुवैद्यक डॉ. मयुर पावशे, अभिरक्षक दिपक सावंत, सहा. वनसंरक्षक  सारिका खोत, सहा. वनसंरक्षक माडभूशी उपस्थित होते. अत्यावश्यक परिस्थिती हाताळाण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पशुवैद्यकिय विद्यापिठाचे प्रमूख आणि वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरिष उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आले होते.

मृत शावकांचे सायंकाळी वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये शव विच्छेदन होऊन सायंकाळी उशीरा अग्नी देऊन शव नष्ट करण्यात आले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान-पिपरी नगरपरिषद सामोर साखळी उपोषणाचा तिसरा दिवस  

Sun Dec 25 , 2022
मोतीराम रहाटे, प्रतिनिधी – गोंडवाना संघर्ष समिती कन्हान व सामाजिक युवा संघटना व्दारे जाहीर समर्थन.  कन्हान (नागपुर) : – शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्थान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने कन्हान शहराच्या विकासा वर आणि मुलभुत सुविधा पुर्ण करण्यावर प्रश्न निर्माण झाल्याने ही जागा शासनाने कन्हान शहराच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यास खरेदी करावी यास्तव सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com