नागपूर :- दादासाहेब बालपांडे “सर्विकल कॅन्सर व त्यावरील लसीकरण जागरूकता” या विषयावर व्याखानाचे आयोजन केल्या गेले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जसमीत चांडोक, सचिव, स्वास्थ्य वृक्ष फौंडेशन व डॉ. संजय धोटे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या व्याखानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला महाजन हे उपस्थित होते. याप्रसंगी व्याख्यानात कॅन्सरवर मार्गदर्शन व सर्विकल कॅन्सरवर मात करणाऱ्या लसीचे फायदे व महत्व पटवून दिले. डॉ. जसप्रीत सिंग चांडोक यांनी या लसीचे महत्व व ही लस घेणे का गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले. येत्या १४ फेब्रुवारी २०२५ ला तायवाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथे या लसीचे लसीकरण होणार असून ९ ते २० वर्षे वयोगटातील मुलींनी हे लसीकरण करून घ्यावे, असे वक्त्यांनी आवाहन केले. संस्थेचे संचालक मनोज बालपांडे व महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. उज्वला महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विद्या साबळे व सौ. रुची शिवहरे यांनी केले.
दादासाहेब बालपांडे कॉलेजमध्ये “सर्विकल कॅन्सर व त्यावरील लसीकरण जागरूकता” या विषयावर व्याखानाचे आयोजन संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com