राज्यातल्या कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी; केली मागणी

मुंबई :- राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर दोन रुपये चेक दिल्याची बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्यसरकारने यावर तातडीने हस्तक्षेप करुन नाफेडसारख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावावा असेही अजित पवार म्हणाले.

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र हे भारतातील मोठ्या प्रमाणावर कांदे पिकवणारे राज्य आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा असून कांदाची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये सुध्दा महाराष्ट्र अग्रेसर आहे. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी फक्त ५०० ते ६०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे. कांद्याच्या दराबाबत शासनाविरोधात राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलने केली जात आहेत. कांद्याबरोबरच कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्षाच्या पिकाला बाजारभावात उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रंचड मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा पिक विक्रीनंतर बार्शी (जि.सोलापूर) येथील शेतकऱ्यांला २ रुपयांचा धनादेश देण्यात आला असून ही शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच आहे. कांदा निर्यातीकरिता केंद्रसरकारने यापूर्वी लागू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरु करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. नाफेड तसेच मार्केटिंग फेडरेशनमार्फंतसुध्दा कांदा खरेदी सुरु करणे गरजेचे आहे असेही अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्रकार शशिकांत वारिशे हत्येचा तपास नि:पक्षपणे करा;पोलीसांना ‘फ्री हॅण्ड’ दया, तपासात राजकीय हस्तक्षेप नको...

Tue Feb 28 , 2023
शशिकांत वारिशे हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधा; पत्रकारांवरचा हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला… पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक मुंबई :- राज्यात रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली, ही पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. वारिशे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो वापरुन रिफायनरीचे समर्थन करत होता. ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com