कन्हान – दिनांक 14/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवीत असताना, खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की शिवाजी नगर कन्हान येथील शाहरुख खान नावाचा इसम आपले ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी माऊझर बाळगून आहे अशी माहिती प्राप्त झाल्या वरून त्याची व त्याचे घराची झडती घेतली असता घर झडती मध्ये एक देशी बनावटीची माऊझर किमती 40000/- रु मिळून आले. आरोपी विरुद्ध कलम 3,25 भा ह का प्रमाणे कार्यवाही केली व पुढील तपास कामी माल व आरोपींस पोलीस स्टेशन कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले.
कार्यवाही पथक :- स.पो.नी. अनिल राऊत पो.हवा. विनोद काळे,ज्ञानेश्वर राऊत, अरविंद भगत ,पोलीस नाईक शैलेश यादव, पो.शी.वीरेंद्र नरड, चा सफौ साहेबराव बहाळे यांनी पार पाडली.
दिनेश दमाहे
9370868686