नवीन शैक्षणिक २०२३च्या सुपर ७५ योजनाचा शुभारंभ

नागपूर :- मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनीयर व लष्करात अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “सुपर ७५” योजने अंतर्गत नवीन शैक्षणीक वर्ष सन २०२३ मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शिकवणी वर्गाचा शुभारंभ झाला आहे.

“सुपर ७५” योजने अंतर्गत सन २०२३ करिता मनपा शाळेतील ८ व्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेवुन ७५ हुशार व होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, या विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गाचा शुभारंभ माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, खाजगी शिकवणी वर्ग संघटनेचे अभय रुईकर, शाळा निरीक्षिका विना लोनारे, अश्वीनी फ़ेदेवार, मुख्याद्यापिका साधना सयाम, संयोजक सुपर ७५ प्रशांत टेंभुर्णे, अल्का राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

सन २०२१ मध्ये माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकारातून व नागपुर खाजगी शिकवणी वर्ग संघटना यांचे सहकार्याने नागपूर मनपा शाळेत विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनीयर व सेनेतील अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्याकरिता सुपर ७५” ही योजना सुरू करण्यात आली व सन २०२१ पासुन या योजनेकरीता निवड झालेल्या हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना मनपा च्या नेताजी मार्केट हिंदी माध्य.शाळा फुल मार्केट, सीताबर्डी, नागपूर या शाळेत खाजगी शिकवणी वर्ग संघटनेच्या मार्गदर्शका कडुन या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन कोर्स शिकविण्यात आला. या मुळे विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी च्या परीक्षेत सन २०२३ मध्ये भरघोस यश संपादन करता आले.

योजने अंतर्गत सन २०२३ करीता मनपा शाळेतील ८ व्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेवुन ७५ हुशार व होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांचा शिकवणी वर्ग शुभारंभ समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करित येथिल शिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण घ्यावेत असा विश्वास व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, सुभाष उपासे यांनी मार्गदर्शन केले. खाजगी शिकवणी वर्ग संघटनेच्या वतीने  अभय रुईकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात शाळा निरीक्षिका विना लोनारे, अश्वीनी फ़ेदेवार व मुख्याद्यापिका  साधना सयाम उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रशांत टेंभुर्णे संयोजक सुपर ७५ यांनी केले तर आभार अल्का राऊत यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एकाच दिवशी रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान

Mon Jul 31 , 2023
– ना.मुनगंटीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा – पालकमंत्री महारक्तदान यज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद – ना.मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम चंद्रपूर :- रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राजकारणात नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या विद्यमान कॅबिनेट व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्ह्यातील हजारो लोकांनी रक्तदान करून रविवारी साजरा केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. ना.सुधीर मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे संपूर्ण जिल्ह्यात ना.मुनगंटीवार यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com