स्व.सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल सांस्कृतिक क्षेत्रासाठी नवसंजीवनी; कलाकारांना मिळणार एकाच छताखाली सर्व सुविधा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

– स्व. सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचे लोकार्पण

मुंबई :- प्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य’ या संकुलात ३६० डिग्री क्रोमा स्टुडिओ, रेकॉर्डिंग, एडिटिंग, मिक्सिंग, चित्रीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्व कलाकारांसाठी या सर्व सुविधा माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचा लोकार्पण सोहळा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, गायिका उतरा केळकर, कला व संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, स्वर गंधर्व सुधीर फडके यांच्या नावाने अद्याप काहीच नव्हतं, आणि म्हणूनच हे नाव देणे हे सर्वार्थाने योग्य होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ‘सुधीर फडके’ हे नाव निश्चित करण्यात आले. या संकुलाच्या निमित्ताने स्व. सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे.

स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचे नाव सुचविण्यापासून ते उभारणी पर्यंत विशेष मेहनत घेणार सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

संकुलाची रचना

स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलामध्ये ध्वनिमुद्रण कक्ष, आभासी चित्रीकरण (क्रोमा) कक्ष, पाच अद्ययावत संकलन कक्ष, रंगपट, पूर्व परीक्षण (प्रिव्ह्यू) दालन, व्हीएफएक्स व प्रशिक्षण वर्ग अशी रचना आहे.

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे महान संगीतकार तसेच भावगीत भक्तीगीतेतील अलौकिक स्वर गंधर्व स्वर्गीय सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांनी ‘देव देव्हाऱ्यात नाही…: या गाण्याने सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून स्व. सुधीर फडके यांच्या चिरंतन स्मृतींना वंदन केले. तसेच यावेळी गायक अजित परब, सोनाली कुलकर्णी, केतकी भावे-जोशी, अभिषेक नलावडे यांचा सहभाग होता. कार्यक्रमात उत्कृष्ट बासरी वादनाचाही समावेश होता. खास सुधीर फडके यांना श्रद्धांजली म्हणून हा अनोखा सांगीतिक क्षण उपस्थितांना भावनिक करून गेला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले तर अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी आभार मानले. सूत्र संचालन कुणाल रेगे व संगीत संयोजन प्रशांत लळीत यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने 'मिशन' राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Apr 10 , 2025
– कर्करोग निदान उपचार बाबत संदर्भ सेवांची कार्यपद्धती ठरवा मुंबई :- राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!