अंतिम २ दिवस शिल्लक, १५ मार्च पर्यंतच मिळणार १०० टक्के शास्ती माफी

अनेक मालमत्ताधारकांनी घेतला शास्तीचा लाभ

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या मालमत्ता कर व इतर करांत १०० टक्के शास्ती माफी मिळण्यास अंतिम २ दिवस शिल्लक असुन अनेक नागरीकांनी शास्ती माफीचा लाभ घेतला आहे. थकबाकीची सद्यस्थिती जाणुन मोठ्या थकबाकीदारांवर मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी कर विभागाच्या बैठकीत दिले.

महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शहरातील नागरिकांना शास्तीत १०० टक्के माफी देण्यात आली होतील. या योजनेचा लाभ शहरातील मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेने या योजनेस १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. अनेक मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असल्याने वसुलीसाठी प्रत्येक झोननिहाय जप्ती पथक गठीत करण्यात आले असुन सदर जप्ती पथके पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येऊ शकतो. १०० टक्के सूट मिळविण्यासाठी बुधवार १५ मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत कराचा भरणा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्याकरिता काढला इंटेक विहिरीतील गाळ..

Mon Mar 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी, ता.१२ : मे महिन्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईने घातलेली भर लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत येरखेडा- रनाळा संयुक्त पाणी पुरवठा योजना अंतर्गत कन्हान नदीवरील गाळेघाट परिसरात असलेल्या इंटेक विहिरीतील गाळ काढून संभाव्य पाणीटंचाईच्या झळांवर घातलेली फुंकर नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे. येरखेडा- रनाळा येथे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने मागील काही वर्षांपूर्वी माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com