डीआरएम कार्यालयातून लॅपटॉप चोरी, मुद्देमालासह आरोपी आरपीएफच्या जाळ्यात

नागपूर :-मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयातील (डीआरएम) एका कर्मचार्‍याचा लॅपटॉप चोरी करणार्‍या आरोपीला आरपीएच्या पथकाने पकडले. रामसजन कन्हया कुमार (18)रा. उत्तरप्रदेश असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा नोेंदवून आरोपीला अटक केली.

चांदूर रेल्वे येथील रहिवासी मनोज ढोकने (39) डीआरएम कार्यालयाच्या प्रशासकीय विभागात कार्यरत आहेत. आरोपीने बुधवार 6 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील दोन बॅग चोरल्या. एका बॅगमध्ये लॅपटॉप तर दुसर्‍या पिशवीत जेवनाचा डबा होता. दोन्ही बॅग घेवून आरोपी रामझुला परिसरात होता.

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान आरपीएफच्या पथकाला रामसजन हा संशयास्पद आढळला. पळून जाण्यापुर्वीच घेराव करून त्याला पकडले. दोन बॅगसंबधी विचारपूस केली असता डीआरएम कार्यालयातून चोरी केल्याचे त्याने सांगितले. आरपीएफच्या जवानांनी लगेच डीआरएम कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी मनोज ढोकने यांनी आपल्या दोन बॅग चोरी झाल्याचे सांगितले. त्यांनी आरपीएफ ठाण्यात बॅगची ओळख पटविली. आरपीएफ पथकासह मनोज सदर पोलिस ठाण्यात पोहोचले. मनोजच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक आर.एल. मीना यांच्या नेतृत्वात बी.डी. अहिरवार, अमोल चार्जगुने, रवींद्र जोशी, सचिन सिरसाट, धीरज दलाल यांनी ही कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार प्रफुल पटेलांच्या आग्रही भुमिकेने चुटिया येथील शेतकऱ्यांना मिळाला न्याय

Thu Sep 7 , 2023
– त्या ४३२ शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुरु गोंदिया :- तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणाला घेवुन पणन विभागाकडून शेतकऱ्यांचे चुकारे अडविण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाचे उंबरठे झिजविले. तरी चुकारे संदर्भात कसलीही कार्यवाही होत नसल्याने २४ ऑगष्ट रोजी शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने खासदार प्रफुल पटेल यांच्याशी भेट घेवून व्यवस्था मंडली. दरम्यान दिलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com