धामणा कारखान्यातील स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या वारसांना अधिक मदत देण्याबाबत विचार करणार – कामगार मंत्री सुरेश खाडे

मुंबई :- नागपूर जिल्ह्यातील धामणा (तुरागोंदी) येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हज या कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या वारसांना संबंधित कंपनी व्यवस्थापनामार्फत २५ लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक मदत देण्याबाबतच्या मागणीवर राज्य शासन निश्चित विचार करेल, अशी माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनधिकृत कारखान्याची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

याबाबत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री खाडे म्हणाले की, दि. १३ जून २०२४ रोजी या कारखान्यात फटाक्यांच्या वातीचे पॅकिंगचे काम सुरु असताना आग लागली व स्फोट झाला. या घटनेमध्ये ९ कामगार गंभीररित्या भाजले. त्यापैकी ५ कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व उर्वरित ४ जखमी कामगारांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इमारतीमधील स्पिनिंग विभागात तयार होणाऱ्या फटाक्याच्या वाती पॅकिंग विभागात आणून त्या आवश्यक लांबीमध्ये कापून या वार्तीचे बंडल तयार केले जातात. ज्वलनशील असलेल्या फटाक्याच्या वातींचे बंडल प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन या पिशवीचे इलेक्ट्रीक सिलिंग मशीनद्वारे पॅकिंग सुरु असताना ज्वलनशील फटाक्याची वात गरम सिलिंग मशीनच्या संपर्कात आल्याने तेथे आग लागली. ही आग लगत असलेल्या पोर्टेबल मॅगझिन रुममध्ये पसरल्याने गन पावडरच्या ५० किलोचा साठा असलेल्या डब्यांमध्ये स्फोट झाला. संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या हा कारखाना बंद करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य अनिल देशमुख, यामिनी जाधव, विश्वजित कदम, राम कदम, अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

Sun Jun 30 , 2024
– तंत्रज्ञानाच्या सहायाने डाटा संकलन पद्धती विकसित कराव्यात – अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा मुंबई :- विकासाच्या विविध योजना राबविताना डाटा संकलन आणि विश्लेषणाच्या नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पद्मविभूषण प्रा. प्रशांत महानलोबीस यांच्या जन्म दिनानिमित्त नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com