कन्हान : – खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व स्वातं त्राचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत पारशिवनी तालुक्यात (दि.२५) जुन ते १ जुलै २०२२ या काला वधी त कृषि संजीवनी मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. अद्यावत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यान पर्यंत पोहचविणे हे या मोहिमेचे उदिष्ठ आहे.
शनिवार (दि.२५) जुन रोजी विविध पिकांचा तंत्र ज्ञान प्रसार व मुल्य साखळी बळकटीकरण पिकांच्या लागवड तंत्रज्ञान, कडधान्य पिकांचा आंतरपीक म्हणुन समावेश, वान बियाणे निवड, बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता चाचणी ई. कार्यक्रम आयोजित करण्या त आले आहेत. (दि.२६) जुन रोजी पौष्टिक तृणधान्य दिवस यामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांची लागवड तंत्रज्ञान, पौष्टिक तृणधान्य आहाराचे महत्व प्रक्रिया व मूल्यवर्धन तसेच शेत तिथे “पौष्टिक तृणधान्य संकल्प ना” या बाबत मार्गदर्शन केले जाईल. (दि.२७) जुन रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस यामध्ये महिलांचे चर्चासत्र, परिसंवाद, व्याखानमाला, महिलां करिता कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षण, पिक तंत्र ज्ञान व महिलांना वापरता येतील असे शेतीतील यंत्र सामग्री संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.(दि.२८) जुन रोजी खत बचत दिन यामध्ये जमीन आरोग्य पत्रि केनुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची खतमात्रा बनवणे, सुक्ष्म मुलद्रव्ये महत्व, विद्राव्य खते व त्यांचा वापर, खताचा अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या बाबत मार्गदर्शन केले जाईल. (दि.२९) जुन रोजी प्रग तशील शेतकरी संवाद दिवस यामध्ये प्रत्येक जिल्हया तील रिसोर्स बँक मधील शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रगतशील शेत करी यांच्या बांधावर क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यात येणार आहे. (दि.३०) जुन रोजी शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस यामध्ये शेती व्यवसाय पुरक जोडधंदा म्हणून फलोत्पादन, संरक्षित शेती, भाजीपाला व फुल लागवड, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेततळ्यातील मत्सपालन, रेशीम उद्योग या बाबत माहिती देण्यात येणार आहे. (दि.१) जुलै रोजी कृषि संजीवनी सप्ता हाची सांगता कृषि दिन साजरा करून होईल सदर मोहीमेची आयोजन सर्व गावत करण्यात आले असून शेतकऱ्यांनी सदर सप्ताहात मोठ्या संखेने सहभागी होऊन मोहिमेचा लाभ घ्यावा. असे आव्हाहन तालुका कृषि अधिकारी डॉ.ए.टी.गच्चे यांनी शेतकऱ्यांना करण्यात केले आहे.