पोरवाल महाविद्यालयात क्रांतीसिंह संत सेवालाल महाराज जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिवस कार्यक्रम समिती व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जीवन परिचय करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विनय चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीसिंह संत सेवालाल महाराजांच्या सामाजिक व धार्मिक कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवर्ती, डॉ.रेणू तिवारी, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.प्रशांत ढोंगळे, डॉ. स्वप्नील दहात, डॉ.इफ्तेखार हुसेन, डॉ.सिद्धार्थ मेश्राम, डॉ. सुदीप मोंडल, डॉ. समृद्धी टापरे, सीडीसी सदस्य डॉ.रेणुका रॉय, भीमराव, राठोड, स्वप्नील राठोड, गिरीश संगेवार, धीरज बेहार, हेमंत शर्मा, मंगेश यादव, गहलोत, सुनील राकडे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.समृद्धी टापरे तर आभार डॉ.अमोल गुजरकर यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोवंश तस्करबाजावर डीसीपी पाच पथकाची धाड,16 लक्ष 25 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त

Fri Feb 16 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – डीसीपी पाचच्या पथकाने दिले 29 गोवंश जनावरांना जीवनदान  कामठी :- गोवंश हत्या बंदी कायदा लागू असूनही अवैध वाहतुकी द्वारे मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची कुणकुण डीसीपी पाच च्या पथकाला लागताच डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ कार्यरत असलेले एपीआय जितेंद्र ठाकूर व पथकाने या गोवंश तस्कर बाजाच्या मुसक्या आवळन्याचे ठरविले असून त्यानुसार योजनाबद्ध पद्धतीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com