कोविड नियमांचा उल्लंघन : शोध पथकाची ३ लॉन वर कारवाई

नागपूरता. १७ :   नागपूर महानगरपालिके तर्फे सोमवारी (१७ जानेवारी) रोजी ९ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून १ लक्ष १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने आशीनगर झोन अंतर्गत श्री पंजाब लॉन, ऑटोमोटीव्ह चौक आणि पाटनकर चौक येथील आदत लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५०,००० च्या दंड वसूल केला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत निर्मला सेलिब्रेशन लॉन, गोरेवाडा रिंग रोड येथे कारवाई करुन २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला.

          प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

          सोमवारी (ता.१७) गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग येथील श्रीकांत साडी सेंटर होलसेल मार्केट वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

             मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नागपुर में CNG की जाल बिछाएगी हरयाणा सिटी गैस समूह 

Mon Jan 17 , 2022
-अदानी को मिला अमरावती,यवतमाळ,अकोला,भंडारा,गोंदिया व गढ़चिरोली जिले का ठेका,ऑटोमोबाइल,इंड्रस्ट्री,हाउसहोल्ड व कमर्शियल के लिए संयुक्त पहल नागपुर – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की देशवासियों को सस्ता,नैसर्गिक ईंधन दिलवाने की संकल्पना को आखिरकार सफलता मिल ही गई.इनकी संकल्पना को कठिन परिस्थितियों में RAWMATT ने पिछले कुछ सालों में नागपुर जिले में BASE तैयार की.अब केंद्रीय स्तर पर महाराष्ट्र के तमाम जिलों में CNG की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com