संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतून पोलीस खात्यातील अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कामकाजामुळे तणावात असतात त्यांना तणावमुक्त करण्याकरिता व शारीरिक फिट राहावे यासाठी त्यांच्या खेळण्याकरिता कामठी तालुक्यातील कोराडी पोलीस स्टेशन च्या आवारात नवीन व्हॉलीबॉल मैदान तयार करण्यात आले ज्याचे उदघाटन परिमंडळ क्र पाच चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.या ग्राऊंडवर परिमंडळ क्र 5 अंतर्गतयेणारेजरीपटका,कपिलनगर,यशोधरानगर, कळमना, पारडी,जुनी कामठी,नविन कामठी ,कोराडी पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांची टीम तयार करून 8 व 9 फेब्रुवारीला दोन दिवसीय व्हॉलीबॉल सामने घेण्यात आले.
9 फेब्रुवारीला सेमी फायनल घेण्यात आले दरम्यान घेण्यात आलेल्या फायनल मध्ये अंतिम सामना कोराडी व कळमना पोलीस ठाण्याच्या टीम मध्ये रंगतदार झाला व कोराडी पोलीस येथील चमू विजयी झाली.विजयी चमू व उपविजेता चमू यांना पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्हॉलीबॉल टूरनामेंट चे बेस्ट लिफ्टर चे बक्षीस हे कोराडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र चोपडे व बेस्ट प्लेअर टुर्नमेंट चे बक्षिस कोराडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश तातोड यांना देण्यात आले.
कोराडी येथील व्हॉलीबॉल चे सामने पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतुन सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी अप्पर पोलिस आयुक्त पी पी शेवाळे ,पोलीस उपायुक्त निकेतन कदम,सहाय्यक पोलिस आयुक्त सत्यविरकुमार बंडीवार,एसीपी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.