कोणत्याही भाषेचे खरे सौंदर्य व्याकरण असते – संकेत डोंगरे

मानवता हायस्कुल येथे राष्ट्रीय व्याकरण-राष्ट्रीय सुरक्षा दिन कार्यशाळा सपन्न

नागपुर – मराठी ही आपली मातृभाषा असल्याने आपली मराठी ही योग्यच असल्याचे प्रत्येक  विद्यार्थ्याला वाटत असते. व्याकरण, वाक्यरचना, वाक्य निर्मितीवर विद्यार्थी हा दुर्लक्ष ठेऊन बसतो. पुढे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांच्या लिखाणातही अनेक व्यकरणाच्या चुका आढळून येतात. शाळेपासूनच मराठी व्याकरण दुर्लक्षित करणे हे त्यांना पूर्ण शिक्षण घेतल्यावर कळते. त्यामुळे कोणत्याही भाषेचे खरे सौंदर्य व्याकरण असते त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे प्रतिपादन नव-युवक एज्युकेशन सोसायटीचे संचालक संकेत डोंगरे यांनी केले. रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मानवता प्राथमिक व हायस्कुल येथे राष्ट्रीय व्याकरण तसेच राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते अध्यक्षस्थाना वरून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेचे उदघाटक म्हणून माजी मुख्याध्यापक पद्माकर पैठणकर , प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वरी प्रभागाचे नगरसेवक मनोज गावंडे तसेच मुख्यध्यापिका सौ. चारूशिला डोंगरे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी मानवता शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
पुढे बोलतांना संचालक संकेत डोंगरे म्हणाले की, शाळेत प्रत्येक मुलांना शिक्षक योग्य उत्तर हे सुंदर अक्षरात आणि स्वच्छ निटनेटके लिहण्याबाबत वारंवार सांगत असतात. पुढे विद्यार्थी शिक्षकांच्या केलेल्या मार्गदर्शनात उत्तीर्ण होत महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण करतो. परंतु, उच्च शिक्षण घेत असताना व्याकरणातील चूकांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शाळेत मराठी मातृभाषा शिकवणाऱ्या शिक्षकांनी व्याकरण, वाक्यरचना, वाक्य निर्मितीवर काळजीपूर्वक लक्ष द्यावे. जर शिक्षकांनी व्याकरणात अधिक भर दिले तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याकरणाची आठवण होणार नाही असेही ते म्हणाले. देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये सावधगिरी बाळगण्यासह सुरक्षेबाबत जागरूक करण्याची गरज आज भासत आहे. त्यामुळेच आज विविध प्रकारच्या दिवस साजरे करून जनजागृती कार्यक्रमांचे उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, जर माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वरक्षण तसेच राष्ट्र रक्षणाचे धडे शिक्षकांनी दिले. तर भविष्यातील विद्यार्थी हे राष्ट्र सैनिक होतील, असेही संकेत डोंगरे यावेळी म्हणाले.
यानंतर निबंध, शुद्धलेखन व वकृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मानवता प्राथमिक व हायस्कुलचे पर्यवेक्षक व्ही. व्ही. गजबे  यांनी तर आभार किशोर गहुकर यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवघ्या एकाच दिवसात चोरीचा पर्दाफाश करण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त

Mon Mar 7 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 7:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फेरूमल चौकातील पेंटच्या दुकानासमोर ठेवलेले 26 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 4 मार्च ला सकाळी साडे आठ वाजता घडली असता यासंदर्भात फिर्यादी उमेश टेकचंद बिचपुरीया ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करीत तपासाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!