नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकऱ्यांची मिळकत कशी वाढली आणि त्यांचे जीवनमान कसे सुधारले, याचा पुनरुच्चार केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचा लेख सामायिक करताना, पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
“केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी नमूद केले आहे की, किसान ड्रोन तंत्रज्ञानातली प्रगती कशाप्रकारे द्रव स्वरूपातील खतांच्या वापरासाठी प्रभावी आणि कार्यक्षम तंत्र प्रदान करते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीमध्ये वाढ होते आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारते आहे.”