४०८ ठिकाणी नवदुर्गाची प्रतिष्ठापना..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

डोल ताशाच्या गजरात मातांचा आगमन

गोंदिया :- दृष्टांच्या सहार आणि भक्तांचे रक्षण करून त्यांना आपल्या छत्रछायाखाली घेणाऱ्या जगतजननी आदिशक्ती, दुर्गा देवी चा नवरात्र उत्सवाला  सुरुवात झाली आहे. या निमित्त शहरसह गावात ही उत्साहाचे आणि आनंदाचे नवरंगात रंगले असून घराघरात घटस्थापना झाली आहे. तर सार्वजनिक मंडपची उभारणी केली आहे. या वर्षी गोंदिया जिल्ह्यात ४०८ दुर्गा देवीची प्रतिष्ठापना होणार.

असून आज सकाळ पासूनच दुर्गा देवीची मूर्ती ‘डोल तासाच्या गजरात भक्त आपल्या मंडपात घेऊ जात आहे. मागील दोन वर्षा पासून कोरोना मुळे नवरात्र उत्सव देखील साजरा करता आलेला नाही. मात्र आता दोन वर्षा नंतर नवरात्री उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. तर मोठ्या भक्ती भावाने भक्त जण दुर्गा देवी प्रतिष्ठापना करण्यासाठी वाजत गाजत आपल्या मंडपात घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com