खोडगाव जि.प. शाळेत उपसरपंचांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

– विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य

रामटेक :- तालुक्याच्या सिमारेषेवर असलेल्या तथा ग्रामपंचायत काचुरवाही अंतर्गत येत असलेल्या खोडगाव येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये उपसरपंच शिशुपाल अतकरे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.

खोडगाव जि.प. शाळेमध्ये १ ते ४ वर्ग आहे. येथे गावातील व परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान नवीन सत्राची सुरुवात झाल्यावर अवघ्या काही दिवसातच या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत काचुरवाही ( खोडगाव ) चे उपसरपंच शिशुपाल अतकरे यांचे हस्ते शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले. यावेळी शिशुपाल अतकरे उपसरपंच ग्रा.पं. काचुरवाही (खोडगाव) यांचेसह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंगेश खवले चंद्रपूर मनपात उपायुक्तपदी रूजू

Sat Jul 15 , 2023
– आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते स्वीकारला कार्यभार चंद्रपूर :- राज्य शासनाच्या सेवेतील मंगेश खवले यांची चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्तपदी नेमणुक करण्यात आली असुन १४ जुलै रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीद्वारे त्यांची नेमणुक करण्यात आली असुन याआधी ते उमरेड नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत होते. चंद्रपूर मनपात उपायुक्त पदाच्या २ जागा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com