कामठी तालुक्यात 24 हजार 820 हेक्टरमध्ये खरिपाचे नियोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला तरीही शेतकऱ्यांनी निसर्गावर विश्वास ठेवत नव्या उमेदीने हिम्मत बांधून कामठी तालुक्यातील शेतकऱ्यानी यावर्षी धानपिकावर विश्वास दाखवीत खरीपाचे 24 हजार 820 हॅकटर मध्ये पेरणी नियोजन केले असून त्यात सर्वाधिक पेरा हा धानपिकाचा राहणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कृषी विभागातर्फे कामठी तालुक्यातील खरीप हंगामासाठी बियाणे,खते व कीटकनाशकांच्या मागणीचे नियोजन केले असून या नियोजन आराखड्यात धानाचा पेरा जास्त प्रमाणात राहणार असल्याचे निर्देशित केले असून 24 हजार 820 हॅकटर जमीन ही पेरनियोग्य असल्याचे सांगण्यात आले यामध्ये धान, कापूस, सोयाबीन, तूर, ऊस,मिरची, ज्वारी खरीप, मका,तीळ यासह ,भाजीपाला पिकांचे नियोजन करण्यात आले आहे.यानुसार कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 10 हजार 551 हॅकटर मध्ये धान पिकाचे नियोजन केले आहे त्या खालोखाल 6509 हॅकटर मध्ये कापूस, 2708 हॅकटर मध्ये सोयाबीन, 2636 हॅकटर मध्ये तूर,677 हॅकटर मध्ये ऊस नवीन लागवड तसेच उर्वरित क्षेत्रात ज्वार खरीप, विविध भाजीपाला,फुलपिके, चारापीके,मिरची व इतर पिकांचे नियोजन करण्यात आलेआहे.

शेतकऱ्यांनी बियाने खरेदी करताना पक्के बिल घेऊनच खरेदी करावे,बियाण्याकरिता संशय आल्यास कृषी विभागाला माहिती द्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बी बियाणे मिळावे,बनावट बियाण्यांची विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाने कटाक्ष नजर ठेवली असून बोगस बियाणे दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Installation of TEAM 2024 of Academy of Pediatrics, Nagpur

Wed May 8 , 2024
Nagpur :- Association of all Pediatricians of Nagpur and Vidharbha, a prestigious organization with over 450 pediatricians committed for betterment of Pediatric fraternity in all witnessed a major event of Installation of new office bearers for the year 2024. Here Dr. Kush Jhunjhunwala took over the reigns as President while Dr. Yash Banait as  Secretary of the organization. In a […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com