खापरखेडा पोलीसने केला हत्यार तस्करचा पर्दाफाश

खापरखेडा :-महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसापासुन बंदुकीने गोळी फायर करून भरपुर गुन्हे घडलेले असल्याने नागपुर ग्रामीण येथील पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपुर ग्रामीण जिल्हयातील उपविभागिय पोलीस अधिकारी व सर्व ठाणेदार यांना आर्म अॅक्टची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी करून नागपुर ग्रामीण पोलीसांनी वेगवेगळ्या पोस्टे. अंतर्गत कोबीग ऑपरेशन करून रेकॉर्ड वरील आरोपींना चेक केले त्याच दरम्यान पोलीस उपविभागिय अधिकारी व ठाणेदार पोलीस स्टेशन खापरखेडा यांनी आर्म अॅक्टची कारवाई करिता एक पथक तयार करून त्या पथकाला आर्म अॅक्टची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्या अनुशंगाने पोलीस स्टेशन खापरखेडयाचे डीबी पथक हे पेट्रोलिंग तसेच आरोपी शोध करिता फिरत असताना वारेगाव क्षेत्रात मच्छीन्द्रनाथ मंदीर जवळ एक इसम संशयितरित्या फिरताना मिळुन आला त्यास पोलीस स्टेशन खापरखेडाचे डी. बी. पथकाने हटकले असता तो कमरेतुन काहीतरी फेकण्याचा प्रयत्न करित असतांना दिसला. त्याला काळजीपुर्वक ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता त्याने सोहेब अब्दुल खान रा. कामठी कॉलनी नं. ०३ ता. पारशिवनी असे सांगितले असता त्याची अंगझडतीत त्याचे कमरेतुन एक देशी कट्टा (अग्नीशस्त्र) कि. १०,०००/- रू. मिळुन आल्याने सदर अग्नीशस्त्रे जप्त करून त्याचेवर कलम ३/२५, ५/२५ माहका सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल केला तपासादरम्यान आरोपी सोहेल खान याने आपले मित्र आशिष यादव आजमगड उत्तरप्रदेश येथे जाऊन लोचय यादव रा. आजमगड उत्तरप्रदेश यांचेकडुन विकत घेतली आहे. यावरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी बी पथक यांनी लगेच कन्हान कांद्री येथुन आशिष यादव नावाचे व्यक्तीला अटक करून ग्राम टोटवा ठाणा महाराजगंज जि. आजमगड उत्तरप्रदेश येथुन लोचय बल्ली यादव यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन खापरखेडा येथे आणुन अटक केले पुढील तपास सुरू आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोहार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार धनाजी जळक, पोउपनि आरती नरोटे, डी.बी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, कविता गोंडाने, मुकेश वाघाडे, राजु भोयर, राजकुमार सातुर यांचे पथकाने पार पाडली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुचाकी चोर पोलीसांच्या ताब्यात, चोरीची एक मोटारसायकल जप्त

Thu Jun 13 , 2024
नागपूर :- फीर्यादी नामे मयुर दत्तु श्रीरामे वय २७ वर्ष, रा. नवेगाव साधु यांनी त्याची होन्डा लीवो कंपनीची मो.सा. क्र. एम. एच. ४०/सी.एस.-७१७० ही दिनांक ०४/०६/२०२४ रोजी से रात्री दरम्यान दत्त कृपा लॉन उमरेड येथे उभी करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने ती चोरून नेली अश्या रीपोर्ट वरून पो.स्टे. उमरेड येथे अप. क्र. २५२/२०२४ कलम ३७९ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com