अरोली :- येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत भांडेवाडी अंतर्गत येत असलेल्या भांडेवाडी (टोला) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंडई निमित्त न्यू बाल मित्र उत्सव मंडळ तर्फे खडी गमतीचे आयोजन करण्यात आले होते. सावनेर तालुक्यातील टेंभुरडोह येथील न्यू परिवर्तन तुर्रा पार्टी कवी बुधाजी यांचे शाहग्रीद शाहीर केशवभाऊ शेंडे यांनी खडी गमतीचे गमतीदार सादरीकरण करून मंडई निमित्त गावात आलेल्या पाहुणे मंडळींना, गावातील व परिसरातील मंडळींना शेवटपर्यंत बसवून ठेवले होते. भांडेवाडी (टोला ) हे गाव रामटेक – भंडारा या महामार्गावर स्थित असून, रामटेक – भंडारा या महामार्गावरही खडी गंमत पाहण्यासाठी गर्दी दिसत होती. या महामार्गावरून येणारे – जाणारे नागरिकही या खडीगमतीचे सादरीकरण पाहण्यासाठी आवर्जून थांबत होते, हे विशेष!
कार्यक्रमाच्या उद्घाटनाला माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे सह गावातील, परिसरातील, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, पुढारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू बालमित्र उत्सव मंडळ भांडेवाडी (टोला) येथील पदाधिकारी गट ग्रामपंचायत भांडेवाडी माजी सरपंच दामोधर वघारे , ग्रामपंचायत सदस्य अंकुश वाघाडे, जीवन राऊत, नितेश चौधरी, मंगेश चौधरी, महेश भोयर, राहुल चौधरी, मनोज वघारे, विष्णू राऊत, शंकर वघारे ,सुनील राऊत ,गजानन सोनवाने, विजय नेवारे, सुमेश कारसर्पे, अर्जुन कारसर्पे, दुर्गेश वघारे ,स्वप्निल वाघाडे, किशोर राऊत ,सौरभ वाघाडे, योगेश राऊत, उमेश चौधरी, किशोर काळसर्फे, रितिक कारसर्पे, हृतिकेश वाघाडे, सागर कारसर्पे, कलेश सहारे, उज्वल राऊत, शुभम राऊत, रुपेश सहारे, मोरेश्वर कारसर्पे कैलास चौधरी, जयदेव राऊत ,अक्षय राऊत मयूर सहारे, शुभम वाघाडे, लोकेश सहारे ,तुषार येसनसुरे, सुमित वघारे, सुशील राऊत, निखिल राऊत, सिद्धू चौधरी, पियुष चौधरी, आदित्य राऊत सह भांडेवाडी (टोला) येथील समस्त नागरिकांनी सहकार्य केले.