हर हर महादेवच्या जयघोषात शेकडोच्या संख्येतील महिलांची कावड यात्रा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 – यात्रेत शेकडोच्यावर संख्येतील भाविकांचा सहभाग

कामठी :- आज यादव समाजच्या वतीने ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले,’ ‘बोलो शंभू महादेव की जय’ असा जयघोष करीत भजनांच्या स्वरात शहरात आज सकाळी 10 वाजता महादेव घाट येथील महादेव मंदिरातून शेकडो च्या वर संख्येतील महिलांनी कावड यात्रा काढली.यादव समाजाच्या वतीने जयस्तंभ चौकातील श्रीकृष्ण मंदिर व सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थानतर्फे भव्य कावड यात्रा शहरात काढण्यात आली.

महादेव मंदिर देवस्थान येथे पंडित महेश यादव यांचे हस्ते कावडांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविक महिलांनी तांब्याच्या २ कळसांसह जरीच्या कापडाने सजविलेल्या कावड घेवून यात्रेत सहभागी झाल्या. कळसांमध्ये जल भरून यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेमध्ये भगवान महादेवाचा जागर केला. ज्यामुळे शहरातील वातावरण भक्तीमय केले. यावेळी हर हर महादेव, ओम नम: शिवाय चा जप करीत यात्रेत शेकडोच्या वरिल भाविकही सहभागी झाले.यात्रेचा महादेव मंदिरातून प्रस्थान करीत छावणी परिसर, त्रिकोणी चौक,नेताजी चौक,जुनी कामठी पोलीस स्टेशन, हैदरी चौक,मोटर स्टँड चौक ,जयस्तंभ चौक,, परिसर मार्गे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे पोहोचुन मंदिरातील शिवलिंगावर हर हर महादेव च्या गजरात पवित्र जलाभिषेक करून ह्या यात्रेचा समापन करण्यात आला . यात्रेत महिला व पुरुष भाविकांनी पारंपारिक वेशभूषा केली होती.

याप्रसंगी राजा महेश यादव,महेश यादव,भुपेंद्र यादव,राजू यादव,छोटू यादव, हिना यादव,पूजा यादव,निलू, किरण,अर्चना, राशी,अर्पणा,निम्मो,राणी,रेखा,लक्ष्मी, डॉली, मंजू,श्वेता, मटका, टकोली,खुशी ,बिज्जू,सुषमा,रंजु,ग्यारसी आदीं भाविक गणाचा सहभाग होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सफाई कामगारांच्या ४२ वारसदारांना नियुक्तीचे आदेश निर्गमित

Tue Aug 6 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे लाड समितीच्या शिफारसी अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील ४२ वारसदारांना स्थायी सफाई कामगार पदावर नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच ३२९ वारसदारांच्या नावावर आक्षेप व हरकती मागविण्याकरिता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. लाड समितीच्या शिफारशी नुसार सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती देण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com