आमदार कृष्णा खोपडेंच्या हस्ते बक्षिस वितरण.
नागपूर :- हिवरी लेआऊट प्रभाग-23 नागपूर येथील हनुमान मंदिरात कार्तिक पौर्णिमा निमित्य झालेल्या बक्षिस वितरणाचे प्रमुख अतिथी आमदार कृष्णा खोपडे यांनी स्पर्धकांचे अभिनंदन करून नागरिकांच्या मागणी नुसार मैदानात भव्य बगिचा तयार करण्याची घोषणा यावेळी केली. यावेळी माजी उपमहापौर मनिषा धावडे, कांता रारोकर, गजानन पांडे, तुकाराम नाकाडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाचे सचिव सुनिल चवरे यांनी केले. तर संचालन व आभार अतुल धांडे यांनी मानले.
जिर्णोध्दार हनुमान मंदिर हिवरी लेखाऊट प्रभाग- 23 नागपूर येथील कार्तिक पौर्णिमा निमित्य तसेच सुवर्ण महोत्सवा निमित्य विविध खेळाच्या (संगीत खुर्ची, बटाटा चमच धावणे, रांगोळी स्पर्धा इत्यादी) स्पर्धाचे बक्षिस वितरण आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी मंचावर माजी नगरसेविका कांता रारोकर, माजी उपमहापौर मनिषा धावडे, पंचकमेटीचे अध्यक्ष तथा अ. भा.ग्राहक पंचायतचे क्षेत्र संघटन मंत्री गजानन पांडे, पंचकमेटीचे सचिव सुनिल चवरे, उपाध्यक्ष तुकाराम नाकाडे उपस्थित होते. हिवरी लेआऊट कार्तिक पौर्णिमा महोत्सव दि. 6 ते 9 नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात आला. यावेळी श्री गजानन महाराजांची पालखी काढण्यात आली मुला मुलींनी श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमान, शिवाजी महाराज, झाशीची राणी तसेच अन्य थोर पुरुषांची वेशभूषा करून इतिहासाचे दर्शन घडविले. यावेळी माजी नगरसेवक दुनेश्वर पेठे, महेंद्र राऊत, जिर्णोध्वार हनुमान मंदिर पंचकमेटीचे अध्यक्ष गजानन पांडे, उपाध्यक्ष तुकाराम नाकाडे, सचिव सुनिल चवरे, राजेन्द्र दाढे, अर्जुन धाडे, रमेश भावरकर, खेमचंदजी श्रीवास, मधुकरराव साठवणे, अशोकराव भगत, भास्करराव कडु, राजेश बेनी, अरविंद अढावु, नवयुवा मंडळाचे अध्यक्ष आकाश बेटे, नितीन धानकूटे, सचिन भावरकर, रोशन दाढे, सचिन पोटभरे, अमन पाल, चंदन बुराडे, विनोद ठाकरे व वस्तीतील नागरिक उपस्थित होते. ह.भ.प. रामभाऊ छोटांगण महाराज मोठी गडपायरी रामटेक यांचे किर्तन, गोपाळकाळा, तसेच महाप्रसादाचे आयोजन कुनेश्वर पेठे यांचेतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुवा मंडळाचे अध्यक्ष आकाश बेटे, नितीन धानकूटे, सचिन भावरकर, राकेश भगत, रोशन दाढे, सचिन पोटभरे, अमन पाल, चंदन बुराडे, विनोद ठाकरे, अतुल धांडे, विठठल रुकमाई महिला भजन मंडळाच्या मंदा नानोटकर, वनिता भगत, संगीता भोयर, कला भावरकर, लता बुराडे, पुष्पा बावनकुळे यांनी परिश्रम घेतले.