संदीप कांबळे,कामठी
-मोफत नेत्र तपासणी शिबिर,समर्थ प्रशिक्षण शुभारंभ
कामठी ता प्र 22:-आंबेडकरी चळवळीत समर्पित असलेले बिडी कामगारांचे नेते कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या 99 व्या जयंतीदिनानिमित्त उद्या 23 मार्च ला सकाळी साडे नऊ वाजता माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली व सत्कारमूर्ती महाराष्ट्र कास्ट्राईब चे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मुख्य उपस्थितीत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच दादासाहेब कुंभारे परिसर स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र कामठी येथे सकाळी साडे अकरा वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात नागपूर येथील महात्मे हॉस्पिटल चे चमू विशेष आरोग्य सेवा पूरवणार आहेत.तसेच वस्त्र उद्योग मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली चे दादासाहेब प्रशिक्षण केंद्र येथे समर्थ प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात येणार आहे तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येतील नागरिकांनी सहभाग दर्शवावा असे आव्हान ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, दादासाहेब कुंभारे परिसर कामठी, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र कामठी च्या वतीने करण्यात आले आहे.
कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com