कन्हानला गणेशोत्सव निमित्य शांतता समितीची बैठक संपन्न..

पर्यावरण पुरक व सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव शांततेने उत्साहात साजरा करण्यास सहकार्य करा. –  वंदना सवंरगपते 

कन्हान : – शहर व ग्रामिण भागातील ३० गावात पर्यावरण पुरक व सामाजिक बांधिलकी जपत गणेश उत्सव शांततेने उत्साहात साजरा करण्यास कन्हान पोलीस व नगरपरिषद, ग्राम पंचायत प्रशासनाला योग्य सहकार्य करा. असे आवाहन  वंदना सवंरगपते उपविभागीय अधिकारी रामटेक हयानी उपस्थित मान्यवर व परिसरातील नागरिकांना आयोजित गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत केले.

मंगळवार (दि.३०) ऑगस्ट ला सायंकाळी ६ वा जता पोलीस विभाग कन्हान द्वारे गणेशोत्सव निमित्य शांतता समितीची बैठक कन्हान-पिपरी नगरपरिषद नविन इमारत येथे  वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्या अध्यक्षेत, प्रशांत सांगोडे तहसिलदार पारशिवनी, योगेंद्र रंगारी उपाध्यक्ष नग रपिषद कन्हान, विलास काळे पोलीस निरिक्षक कन्हान, सुनिता मेश्राम सरपंचा टेकाटी (को.ख) आदीच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली. याप्रसंगी पत्रकार, सरपंच, उपसरपंच, पाेलीस पाटील, शांतता समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सार्व जनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, डी.जे, मंडप, डेकोरेशन आणि प्रतिष्ठीत नागरिकांना गणोत्सव साजरा करताना घेण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनाची माहीती प्रशांत सांगोडे तहसिलदार यानी आपल्या मार्गदर्शनातुन दिली. गणपती स्थापना पासुन तर विसर्जना पर्यंत गणेशोत्सव साजरा करित असताना पर्या वरण पुरक व सामाजिक बांधिलकी जपत घरघुती व सार्वजनिक गणेश उत्सव शांततेने उत्साहात साजरा करण्यास कन्हान पोलीस व नगरपरिषद, ग्राम पंचायत प्रशासनाला योग्य सहकार्य करा. असे आवाहन वंदना सवंरगपते उपविभागीय अधिकारी रामटेक हया नी उपस्थित मान्यवर व परिसरातील नागरिकांना गणेशोत्सव निमित्य शांतता समितीच्या बैठकीत केले. शांतता बैठकीस पत्रकार मालविये , मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, रविंद्र दुपारे, ऋृषभ बावनकर , रोहीत मानवटकर, ढिवर, भोई समाज संघटना अध्यक्ष सुतेश मारबते, सामाजिक कार्यकर्ता भुषण इंगोले, प्रशांत मसार, दिलीप राईकवार, प्रविण गोडे, दिपक तिवाडे, आशाताई पाहुणे सरपंचा निलज, वैशाली थोरात, नितु तिवारी सह पोलीस पाटील, मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, पोलीस व नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Vice Chief of Naval Staff visit to Nagpur.

Wed Aug 31 , 2022
Nagpur – The Vice Chief of Naval Staff has visited M/s Economic Explosives Limited (EEL), Nagpur on 28 Aug 22. The visit was primarily aimed to review various indigenous projects pertaining to Naval Armament Stores as part of Aatma Nirbhar Bharat and explore the possibilities of absorbing weapons currently under development by the industry partner. The VCNS also stressed on […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com