मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) :- पांधन रोड हनुमान नगर येथील आठवडी बाजारातुन दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला कन्हान पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन दुचाकी वाहन जप्त करून पुढील कारवाई सुरु केली आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.२३) डिसेंबर ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान कैलाश सकाराम बडवाईक वय ३९ वर्ष राह.राधाकृष्ण नगर कन्हान हे आपली बजाज डिस्कवर १०० सी.सी दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ए ई ४५८६ किंमत २०,००० रूपये ही पांधन रोड हनुमान नगर येथील तांबे यांच्या घरा जवळ रोडच्या बाजुला उभी करून बजार करण्या करिता गेले आणि बाजार करून आपल्या दुचाकी वाहन ठेवलेल्या ठिकाणी परत आले असता कैलाश यांची दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने पोलीसांनी कैलाश यांचा तक्रारीने पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र ७४८/२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल असतांना आरोपीचा शोध कामी कन्हान पोलीस बुधवार (दि.२८) डिसेंबर ला दुपारी १२ ते २ वाजता दरम्यान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाल्याने पोलीसांनी विजेंद्र कोसळकर ह्याचा घराची झडती घेतली असता आरोपीच्या घरी चोरीस गेलेली बजाज डिस्कवर १०० सी.सी दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ए ई ४५८६ किंमत २०,००० रूपये मिळुन आल्याने पोलीसांनी पंचा समक्ष जप्त करून आरोपी विजेंद्र कोसळकर यास अटक करून कारवाई केली.
सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक सतीश मेश्राम, पोलीस हवालदार हरिष सोनभ्रदे, पोलीस नापोशि प्रशांत रंगारी, पोलीस शिपाई सम्राट वनपर्ती, वैभव बोरपल्ले, चालक बंटी आदी सह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.