अवैधरित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीस कन्हान पोलीसांनी केली अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत केमीकल ग्राउंड कन्हान येथे अवैधरित्या लोखंडी तलवार घेऊन फिरणारा आरोपी पियुष रंगारी यास कन्हान पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवार जप्त करून पोस्टे ला त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१२) डिसेंबरला रात्री १० ते १०:३० वाजता दरम्यान पो.ना. शैलेश राजाराम वराडे आपल्या सहकार्या सह पो.स्टे. कन्हान परिसरात सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि, केमीकल मैदान कन्हान जवळ एक ईसम पायी फिरत असुन त्याच्या जवळ तलवार सारखे शत्र दिसत आहे.अश्या विश्वसनीय खबरे वरून पो.ना. शैलेश वराडे सहकार्यासह केमीकल मैदानात पोहचले असता एक इसम आपल्या कंबरेच्या डाव्या बाजुला एक लोखंडी तलवार घेवुन जातांना दिसला पोलीसांना वर्दीत पाहुन इसम पळु लागला पोलीसांनी पाठलाग करित घेराव टाकुन त्यास पकडुन त्याच्या कमरेत असलेला तलवार ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने पियुष नामदेव रंगारी वय १९ वर्ष, राह पिपरी, ग्राम पंचायतच्या मागे कन्हान असे सांगितल्याने पोलीसांनी आरोपी पियुष रंगारी यास ताब्यात घेऊन पो. स्टे ला सरकार तर्फे फिर्यादी पो.ना शैलेश राजाराम वराडे यांच्या तक्रा रीने आरोपी पियुष रंगारी यांचे विरुद्ध अप क्र. ७१४ /२२ कलम ४/२५ भा.ह.का. सहकलम १३५ मपोका. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पो लीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

50 कस्बों तक पहुंची 5G स्पेक्ट्रम सेवाएं: सरकार

Wed Dec 14 , 2022
नागपुर :- सरकार ने बताया कि दूरसंचार सेवा प्रदाताओं ने एक अक्टूबर 2022 से देश में 5जी सेवाएं उपलब्ध करानी शुरू कर दी हैं और पिछले महीने तक 50 कस्बों में 5जी सेवाएं शुरू हो गई हैं। लोकसभा में प्रो. सौगत राय के प्रश्न के लिखित उत्तर में संचार, इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्री अश्विनी वैष्णव ने यह जानकारी दी। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!