– वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांचे प्रशासना ला निवेदन
कन्हान :- देशात ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) संदर्भात सतत वादंग सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने कन्हान नगरपरिषद निवडणुक बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी करून पक्षाच्या महासचिव व कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामन मेश्राम यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा मॅडम हयांना लेखी निवेदन देऊन ईव्हीएम विरोधात निवडणुक बहिष्कार जन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सन २०१४ पासुन देशभरात ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यापासुन निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणा त छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केला आहे. ईव्हीएम हॅकिंग, बटन कोणत्याही पक्षाला दाबले तरी भाजपलाच मत जाणे, काही ठिका णी मशीन गायब होणे अशा घटनांमुळे जनतेत संभ्रमा चे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान अशा अनेक राज्यांत निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनबाबत गोंधळ आणि संशयास्पद प्रकार समोर आले आहेत. पक्षपाती निवडणुक आयोग, भाजपला अनुकूल निकाल आणि पारदर्शकतेचा अभाव हे मुद्दे विरोधकांनी सातत्याने उपस्थित केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने आप ल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम वर जनते चा विश्वास राहिलेला नाही, आणि त्यामुळे बॅलेट पेपर वरच मतदान घ्यावे.
“भारतात निवडणुक प्रक्रिया पारदर्शक राहिली पाहिजे. मात्र गेल्या काही निवडणुकां मध्ये भाजप सरकार च्या धोरणांमुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे. निवडणुकीत सातत्याने घडणाऱ्या गडबडींमुळे जनतेचा विश्वास उडाला आहे,” असे वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनात म्हटले आहे. येत्या नगरपरिषद निवडणुकीत पारदर्शकता आणि लोकशाही प्रक्रिया अबाधित ठेवण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर पद्धतीने निवडणुक घेण्याचा ठराव मंजुर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. “जर प्रशासनाने ईव्हीएम मशीन हटवण्याचा निर्णय घेतला नाही, तर आम्ही निवडणुक बहिष्कार जनआंदोलन उभारू आणि त्यासाठी होणाऱ्या गोंधळाची पूर्ण जबा बदारी शासन-प्रशासनावर असेल,” असा थेट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. वंचित बहुजन आ घाडीने ही मागणी केवळ नगरपरिषद पर्यंत मर्यादित ठेवली नाही, तर देशभरात याबाबत आवाज उठवण्या साठी विविध शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयां ना देखिल निवेदनाची प्रत पाठवली आहे.
कन्हान शहर आणि परिसरातील अनेक नागरि कांनी वंचित बहुजन आघाडीच्या या मागणीस पाठिंबा दिला आहे. बऱ्याच लोकांचे मत आहे की, ईव्हीएम द्वारे मतदान करताना गोंधळ निर्माण होतो, त्यामुळे पारंपरिक बॅलेट पेपर प्रणाली हाच उत्तम पर्याय आहे. या मागणीवर कन्हान नगरपरिषद आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारला जाणार का ? याबाबत लवकरच स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, जर प्रशासन आणि निवडणुक आयोगाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर मोठे जन आंदोलन छेडले जाईल. “लोकशाही टिकवायची असेल, तर बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल. नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल!” असा इशारा वंचित बहुजन आघाडी ने दिला आहे.