संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस एक कि मी अंतरावर तारसा रोड शिवनगर येथील कोणीतरी अज्ञात चोराने एच डी एफ सी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार अरूण दलबहादुर थापा वय ३९ वर्ष राह रायनगर कन्हान हे माॅर्डन विर रायस सेक्युरीटी कंपनी मध्ये चार वर्षापासुन सुरक्षा रक्षकांचे काम करित असुन अरूण थापा यांच्या कडे एकुण ०९ एच डी एफ सी तपासणी आणि ग्रस्त घालण्यासाठी दिले असुन त्यापैकी ०२ एटीएम एचडीएफसी आणि १ एटीएम आयसीआयसीआय हे कन्हान शहरातील आहे. रविवार (दि.२२) मे ला सकाळी ७ वाजता दर म्यान अरूण थापा हे कामठी येथील एक्सीक्स बँकेचे एटीएम तपासण्यासाठी गेले असता तेव्हा सकाळी ७. ११ वाजता दरम्यान कंपनीच्या नियंत्रण कक्षातुन फोन आला की कन्हान च्या तारसा रोडवरील एचडीएफसी बँकेचे एटीएम असुन ज्याचा आयडी पी३ईएनएनआर ३० नसुन येथे कोणीतरी अज्ञात चोर एटीएम मध्ये छेड छाड करत आहे. असा फोन आल्यावर कामठी वरून कन्हान ला येऊन तारसा रोड शिवनगर येथे सकाळी ७ .१९ वाजता दरम्यान बँकेच्या एटीएममध्ये जाऊन तपा सणी केली असता एटीएमची क्लिप तुटलेली दिसल्या ने सदर घटना आपल्या सिक्युरिटी कंपनीस सांगितली . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हान, कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे, एपीआई सतीश मेश्राम, राहुल रंगारी, सुधीर चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असुन फिंगर एक्सपर्ट पथक व श्वान पथख चे पोलीस उपनिरीक्षक काळे व इतर कर्मचारी यांनी भेट दिली.
तारसा रोड शिवनगर कन्हान येथील कोणीतरी अज्ञात चोराने एच डी एफ सी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी अरूण थापा यांच्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ३०८/२०२२ कलम ३७९ , ५११ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यां च्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपी चा शोध घेत आहे.