कन्हान : – शहरात मुस्लिम बांधवा द्वारे रमजान महिन्यातील रोजा ठेऊन ईद च्या दिवसी नमाज करून सुख, शांती व बंधुभाव सदैव राहण्याची प्राथना करून ईद उल फित्तर मोठ्या उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. रमजान पर्वातील महिना भराचे रोजा बांधवांनी पूर्ण करत शनिवार (दि.२२) एप्रिलला सुन्नी रजा मश्जीद येथे ईद उल फित्तर थाटात साजरी केली. सकाळी नऊ वाजता शहरातील पटेल नगर येथील सुन्नी मस्जिद मध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्तर ची सामुहिक नमाज पठण करून शहरासह संपुर्ण देशात सुख, शांती आणि एकोपा नांदो अशी दुआ करण्यात आली. तसेच आनंदमय वातावरणात अमन व भाईचारासाठी प्रार्थना करण्यात आली. त्या नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी हॉजी अनिस अहमद सिध्द्दीकी, युवक कॉग्रेस कन्हान अध्यक्ष ऑकिब सिध्द्दीकी, हबीब शेख, जमशेद सिध्द्दीकी, सबरेआलम खान, आशिफ सिध्द्दी की, अकरम शेख, बेलाल सिध्द्दीकी, अनस शेख,अर्शद शेख आदी सह समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित राहुन ईद उल फित्तर थाटात साजरी केली. रमजान ईद निमित्त शहरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या निवास स्थानी इतर समाज बांधवांसाठी ईद मिलन कार्यक्रमा चे आयोजन करून सेवई, खीर खुर्माचा खाऊ घालुन बंधुभावाचा संदेश दिला. रमजान ईद निमित्य शहरात आणि परिसरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या नेतृत्वात पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.