कामठीच्या तरुणाचा नागपूरात खून.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-क्षुल्लक वादातून तरुणाचा खून ,दोघे जख्मि

कामठी ता प्र 9 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रविदास नगर रहिवासी तरूण हा आपल्या तीन मित्रासह दोन दुचाकीने डबल सीट ने नागपूर येथील कळमना स्थित भरत नगर येथे आयोजित एका सगाई कार्यक्रमात सहभागी होण्यास जात असता कार्यक्रम स्थळाचा पत्ता विचारण्यासाठी गुलमोहर नगर कळमना येथे दुचाकीने थांबले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीचालकाने दिलेल्या धडकेतुन घडलेल्या क्षुल्लक वादातून आरोपिने कामठी रहिवासी तरुणास चाकूने वार करून खून केल्याची घटना काल सायंकाळी 7 दरम्यान घडली असून खून झालेल्या तरुणाचे नाव अजय चंदनिया वय 22 वर्षे रा रविदास नगर कामठी असे आहे तर जख्मि दोन मित्रांमध्ये श्याम देवांगण वय 22 वर्षे रा आनंद नगर,देवेंद्र देवांगण वय 20 वर्षे रा आनंद नगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा आपल्या दुचाकी क्र एम एच 40 सी ई 0017 ने मित्रासह जात असता वस्तीतील ओळखीच्या असलेल्या व्यक्तीच्या सगाई कार्यक्रमात सहभागी व्हायला इतर दोन मित्र असे एकूण चार जण जात असता गुलमोहर नगर जवळ कार्यक्रम स्थळाचा पत्ता विचारत असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरोपी विनय शाहू आपल्या भाच्याचा वाढदिवसाचा केक घेण्यासाठी जात असता सदर मृतकाच्या दुचाकीला लागलेल्या कट मधून झालेला क्षुल्लक वाद हा विकोपाला गेला व रागाच्या भारात आरोपी शाहू ने मृतक अजय चंदनियाच्या पोटावर चाकूने वार करून ठार केले .या घटनेत मृतकाचे सहभागी असलेले इतर दोन मित्र ही जख्मि आहेत.कळमना पोलिसांना माहिती कळताच यासंदर्भात एपीआय देवाजी नरोटे सापोलिसासह घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नजीकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी आरोपी विनय साहू रा कळमना नागपूर विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपी विनय शाहू हा हमालाचे काम करीत असून काल 8 जानेवारीला भाच्याचा वाढदिवस असल्याने केक विकत घेण्यासाठी जात असता गुलमोहर नगर परिसरात मृतकाच्या दुचाकीला लागलेल्या धडकेतून नुकसानभरपाई मागण्याचा वादातून विकोपाला गेलेला वाद खुनाच्या घटनेत घडला तर मृतक हा खाजगी कामे करीत असून रविदास नगर कामठी चा रहिवासी आहे.घरची हालाखीची परिस्थिती असून मृतकाच्या कुटुंबात आई ,वडील ,दोन भाऊ व एक बहिण असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

No work and full Pay for WCL Wani North Area workers, Blessings of the WCL Officers!

Mon Jan 9 , 2023
Nagpur – This sensational matter was informed to News Today 24×7 team by local INTUC Leader Abid Hussain from WCL (WESTERN Coalfields Limited), Wani North Zone. Abid Hussain has made a very grievous allegation About workers getting their monthly salary with all allowances and employment benefits by just getting their attendance logged for the day and being absent from the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com