संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
-विकासकामांच्या फलकाविनाच होताहेत बांधकामे
कामठी ता प्र :- दलित वस्त्यांचा विकास व्हावा यासाठी विशेषतः दलित वस्तीसुधार योजने अंतर्गत कामठी नगर परिषद ला मोठा शासकीय निधी प्राप्त होत असतो. मात्र संबंधित प्रशासन व कंत्राटदार यांच्या संगनमताने भ्रष्टाचाराचे कुरण पाळत ह्या दलित वस्ती च्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चेला नेहमीच उधाण असते ज्याचे प्रकरण कामठी नगर परिषद ला बहुधा उघडकीस आले आहेत तरीसुद्धा बांधकामातील भ्रष्टाचार कमी होताना दिसत नाही ज्याची प्रचिती नुकतेच प्रभाग क्र 3 मध्ये झालेंल्या सिमेंट रस्ता बांधकामातुन दिसून येते. एक आठवड्यापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रास्ता बांधकामाचे मुख्य राज उघडले असून एक आठवड्यातच या नवनिर्मित सिमेंट रस्त्याचे गिट्टी दिसू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 3 मधील नयानगर येथील राजकुमार गेडाम च्या घरामागून ते संदीप गणवीर यांच्या घरापर्यंत दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले.वास्तविकता कुठल्याही विकासकामांचे बांधकाम करताना त्या ठिकाणी विकासकामांचे अंदाजपत्रक काम फलक लावणे गरजेचे आहे मात्र संबंधित कंत्राटदाराने हे बांधकामाचे कंत्राट बिलो मध्ये घेऊन नगर परिषद वर जणू उपकार केला की काय या भूमिकेतुन त्या ठिकाणी कुठलेही फलक न लावता आवाज उठविणाऱ्या तेथील मुख्य लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले.परिणामी या रस्ता बांधकामात कुठलाही राम दिसून येत नाही तसेच या नवनिर्मित रस्त्यावर पाणी साचून राहत असून पाणी वाहून जात नाही तर सदर नवनिर्मित सिमेंट रस्त्याचे गिट्टी वर दिसून येत असल्याने तेथिल नागरिकांत सिमेंट रस्ता बांधकामाविषयी रोष आहे.पण दाद मागायची कुणाला?असा प्रश्न नागरिकांच्या समोर उभा होऊन ठाकला आहे.तेव्हा या सिमेंट रस्ता बांधकामाची संबंधित नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन दोषी कंत्राटदारावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.