कामठीत आयपीएल चा सट्टा तेजीत

संदीप कांबळे, कामठी
-आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी सटोडीयांची खायवाडी सुरू
कामठी ता प्र 28:- 26 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)क्रिकेट स्पर्धाचा थरार पुन्हा एकदा सुरू झाला असून सुमारे दीड ते दोन महिने चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावर सट्टा लावणे व खाणाऱ्यांची शहरात मोठी संख्या आहे . यामध्ये कामठीत आयपीएल मधील प्रत्येक सामन्यावर लाखो रुपयाचा सट्टा खेळला जात असून येथील सट्टा माफिया च्या माध्यमातून या सट्टा व्यवसायिकाचा धंदा तेजीत सुरू आहे.आयपीएल च्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील सटोडी सज्ज झाले असून त्यांनी आपली खायवाडीची दुकाने सुरू केली आहेत.मात्र पोलीस विभाग मिळत असलेल्या चिरीमिरी मुळे बघ्यांची भूमिका घेत डोळे मिटून बसले आहेत. तेव्हा या आयपीएल च्या सटोरी बाजावर कारवाही होईल काय?या चर्चेला उधाण आहे.
कामठी शहर सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यासाठी कुप्रसिद्ध आहे , जुगार, मटका, गुटखा,तंबाखूजन्य पदार्थाच्या पदार्थाच्या अवैध विक्रीसह येथे क्रिकेटचा सट्टा सुद्धा मोठ्या प्रमानात चालतो .कामठी शहरातील सटोडीयाकडे फक्त शहर व तालुक्यातीलच नाही तर तेलंगणाच्या आदीलाबाद,हैद्राबाद शहरातील जुगाऱ्यासह आदी ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातील जुगारी क्रिकेट वर सट्टा लावीत असतात.यावरून येथील क्रिकेटच्या सटट्याची व्याप्ती किती असेल हे कळून येते.
आयपीएल स्पर्धेमुळे क्रिकेट विश्वाचे रूप पालटले या स्पर्धेच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण क्रिकेटविश्वात होते. आयपीएल स्पर्धेवर खेळल्या जाणाऱ्या सटट्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते ज्याचे सूत्र कामठीत सुद्धा जडले असून शहरात आयपीएल स्पर्धेवर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांची साखळी तयार झालि आहे .मोबाईल, संगणक च्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडलेले असतात एवढेच नव्हे तर व्हाट्सएप चा माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावी सट्टेबाजी सुरू आहे. कामठी पोलीस स्टेशन हद्दीत कित्येक वस्त्यांची गर्भश्रीमंतांची वस्ती म्हणून ओळख आहे तर यामध्ये शहरातील उचभ्रू तसेच व्यावसायिक वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे तसेच यातील बहुतांश वर्ग हा सट्टेबाजीत गुंतलेला असून गुप्तचर रित्या मोठ्या प्रमाणात सट्टा व्यवसाय करीत आहेत आणि या प्रकारच्याच व्यवसायासाठी म्हणून सत्ताधारी राजनेत्याचे संरक्षण पाठीशी घेतात व राजकीय पाठबळाचा पुरेपूर फायदा घेत असतात. सट्टा खेळणारा आणि सट्टा घेणारा सट्टेबाज यांच्यातील सर्व व्यवहार मोबाईल च्या माध्यमातून होत असतो. सट्टा घेणाऱ्याला बुकी म्हणतात तर बुकीला प्रत्यक्ष न भेटता सर्व व्यवहार केवळ विश्वासावर केले जातात तर ज्या ठिकाणी सट्टा घेतला जातो तेथे दूरचित्रवाणी संच आणि दहा ते पंधरा मोबाईल असतात .सामन्यातील प्रत्येक चेंडू, धावा, चौकार,आणि शटकावर सट्टा खेळला जातो प्रत्येक सामण्यानुसार सट्टा भाव ठरतो .एक रुपयांना दहा रूपये असा भाव असतो काही सामन्यात कमकुवत संघावर सट्टा खेळल्यास तो संघ विजयी झाल्यावर एका रुपयावर पन्नास ते शंभर रूपये भाव देण्यात येत असतो .हा सट्टा बहुतांश तरुण वर्ग तसेच व्यावसायिक वर्ग हे बहुधा बिअर बार तसेच हॉटेल वा टिव्ही समोर बसून घरूनच सट्टा लावण्याचा सपाटा सुरू आहे तर पोलिस विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते तर तरुण पिढी तसेच या क्रिकेट सट्टा व्यावसायिक विशेषता बिअर बार मध्ये मद्यप्राशन च्या नावाखाली सट्टा लावून स्वतःच जीवन उध्वस्त करीत असल्याचा प्रकार दिसून येतो मात्र संबंधित पोलीस विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरवीत आहेत.

-आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधी येथील पोलीस स्टेशन च्या साहेबांच्या विश्वासातील खाकी बाबू ने सटोडीयांशी संपर्क साधून क्रिकेट सट्टा चालविण्यासाठी अलिखित परवानगी मिळवून दिल्याने अनेकांनी आयपीएल चा ‘श्री गणेशा’सुरू केल्याची चर्चा शहरात रंगत आहे.त्यामुळे आगामी दिवसात येथील सटोडीयावर कार्यवाह्या होण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे.शहरातील काही सटोडीयांनी आपल्यावर कारवाही होऊ नये यासाठी काही राजकोय पक्षाच्या नेत्यांचा आडोसा घेतला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पुरस्काराचे वितरण

Mon Mar 28 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता, प्र 28 – सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक 21 /3/22 पासून ते 26/3/22 पर्यंत महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सलाद स्पर्धा,हस्त लेखन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, बेस्ट फ्रॉम वेस्ट स्पर्धा, विविध क्रीडेशी संबंधित खेळ स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम मागील सात दिवसापासून चालू होता या कार्यक्रमामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com