– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 25 :- शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आर टी ई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व मागास घटकातील मुलांच्या प्रवेशासाठी कामठी तालुक्यातील 40 शाळांमधील 418 जागा उपलब्ध आहेत ज्यामध्ये 56 जागा नर्सरी प्रवेश तसेच 362 जागा ही प्रथम वर्ग च्या प्रवेशासाठी निश्चित केल्या असून शैक्षणिक वर्ष 2022-23साठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे.
आर टी ई 25 टक्के प्रवेशाचे 2022-23या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे त्यानुसार 16 फेब्रुवारी पासून आर टी ई प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत दरम्यान अर्ज दाखल करण्याची अंतींम तारीख 2मार्च राहील .दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी पालकाचं आधार कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र , रेशन कार्ड, ड्रॅयविंग लायसन्स, , वीज टेलिफोन देयक, घरपट्टी आदीपैकी कोणताही एक पुरावा निवासी पुराव्याकरोता ग्राह्य धरण्यात येणार आहे.निवासी पुरावा म्हणून गॅसबुक रद्द करण्यात आले आहे यापैकी निवासाबाबत पुरावा नसल्यास दुय्यम निबंधकच कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करार ग्राह्य धरण्यात येणार आहे.भाडे करार हा फार्म भरण्याच्या दिनांकच्या पूर्वीचा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असणे बंधनकारक आहे.
वर्ष 2022 -23या शैक्षणिक वर्षांमध्ये आर टी ई अंतर्गत प्रवेश घेताना उत्पन्नाचा पुरावा म्हणून सन 2020-21किंवा 2021-22या वर्षाचा पालकांचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान शिक्षण विभागाचे अधिकारी सव्वालाखे यांनी केले आहे